चिपळूण : गेल्या काही दिवसापासून पेट्रोलने दरांची शंभरी ओलांडली आहे. डिझेलही त्या उंबरठ्यावर आहे. इंधनावरचा खर्च वाढल्याने वाहतूकदारांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे अधिकच कंबरडे मोडणार आहे. येत्या काळात महागाई अधिक वाढल्याने शक्यता वाढली आहे.
रक्तगट सूची तयार
दापोली : येथील कै. कृ ष्णमामा महाजन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रक्तगट सूची तयार करण्यात आली आहे. यामुळे गरजू रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध होणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी गुगलवरील फॉर्म भरावा, असे आवाहन या प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
मोहिरेचे यश
देवरुख : दिगंबर जैन कासार समाज संस्थेने रत्नागिरी जिल्हा सचिव अजित मोहिरे यांचा सुपुत्र मानस यांनी इंग्लंडमधील शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्यासह यश मिळविले आहे. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यात मानस मोहिरे यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
चिखलाचे साम्राज्य
खेड : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावर अनेक भागांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम केल्याने रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर माती आली आहे. या मातीमुळे आता महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
वृद्धाश्रमाला मदत
लांजा : तालुक्यातील देवधे येथील अल्फोन्सा या वृद्धाश्रमाला आसगे येथील युवकांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात या वृद्धांना खाद्यवस्तूंची भेट दिली आहे. तसेच या वृद्ध व अनाथांची सेवा करणाºया या वृद्धाश्रमासाठी सॅनिटायझर, मास्क आदी वस्तू व्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.