राजापूर : भारतीय लष्करी सेवेत कर्तव्य बजावत असताना ‘ब्रेन हॅमरेज’ने मृत्युमुखी पडलेला तालुक्यातील ओणी गावचा सुपुत्र प्रदिप जयराम गुरव यांच्यावर गुरुवारी ओणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थीत होते.हैद्राबादमधील आर्मीच्या मुख्यालयात आपले कर्तव्य बजावत असताना प्रदिप गुरव यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता व त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. ही खबर ओणी गावात येवुन पोहचली व शोककळा पसरली. मागील काही वर्षे प्रदिप गुरव सैन्यात मेजर पदावर कार्यरत होते. हैद्राबाद मधील आर्मीच्या मुख्यालयात प्रशिक्षणादरम्यान त्यांची मानेची नस दबली व त्यानंतर त्यांना त्रास होवू लागला होता. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु झाले होते. मात्र त्यादरम्यान गुरव यांची प्राणज्योत मालवली होती.त्यांचे पार्थिव हैद्राबादवरुन गोव्याला विमानाने आणण्यात आले व तेथुन ते त्यांच्या ओणी गावी गुरुवारी सकाळी आणण्यात आले होते. त्यानंतर ओणीतील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार पार पडले त्यावेळी राजापुरचे प्रभारी तहसिलदार शरद गीते, पोलीस उपनिरिक्षक संजना फाळके तसेच भारतीय सैन्यदलातील अधिकारी उपस्थीत होते .ओणी गावच्या या सुपुत्राला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. दुखवटा म्हणुन ओणी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)
जवान प्रदीप गुरव याच्यावर अंत्यसंस्कार
By admin | Published: March 16, 2017 7:05 PM