खेड : लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन चढ्या भावाने विदेशी मद्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका ४१ वर्षीय प्राैढाला खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व त्यांच्या पथकाने रंगेहात पकडून गजाआड केले. याप्रकरणी संशयिताकडून पोलिसांनी १५ हजारांचा विदेशी मद्यसाठाही जप्त केला.
पोलीस स्थानकातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस शिपाई संकेत गुरव, अजय कडू, किरण चव्हाण यांच्या पथकाने सुसेरी क्रमांक २ येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तुषार तानाजी बावकर याच्या घरी धाड टाकून पंधरा हजार रुपये किमतीचा विदेशी दारुसाठा गैरकायदा बिगरपरवाना लोकांना चढ्याभावाने विक्री करण्यासाठी आपले ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहात पकडून तुषार तानाजी बावकर (४१, रा. सुसेरी क्र. २, खेड) याच्याविरुध्द खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.
-----------------------
खेड तालुक्यातील सुसेरी क्र. २ येथे पोलिसांनी कारवाई करून बेकायदेशीररित्या विनापरवाना विक्रीसाठी बाळगलेला विदेशी मद्यसाठा जप्त केला.