शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गजानन पाटील

By मेहरून नाकाडे | Published: May 29, 2023 5:15 PM

पाटील यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी वर्णी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गजानन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसभापतीपदी सुरेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक झाली होती. या निवडणूकीत सर्व पक्षिय ‘सहकार पॅनल’ ने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद यश संपादन केले होते. एकूण ११ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. बाजारसमितीसाठी सहकार पॅनलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, ठाकरे सेना, शिंदे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र तीन अपक्ष उमेदवारामुळे निवडणूक घ्यावी लागली होती. सहकार पॅनलचे हेमचंद्र माने (भाजप), गजानन पाटील (शिंदे सेना) सुरेश कांबळे (राष्ट्रवादी) हे तीन संचालक आधीच बिनविरोध निवडून आले होते. अकरा जागांमध्ये अरविंद आंब्रे (राष्ट्रवादी) विजय टाकळे (राष्ट्रवादी), मधुकर दळवी (शिंदे सेना), नैनेश नारकर (ठाकरे सेना ), रोहित मयेकर (शिंदे सेना), सुरेश सावंत (राष्ट्रवादी), संदीप सुर्वे (ठाकरे सेना), स्मिता दळवी (राष्ट्रवादी), स्नेहल बाईत (ठाकरे सेना), ओंकार कोलगे (शिंदे सेना), प्रशांत शिंदे (ठाकरे सेना) विजयी झाले होते.सभापती, उपसभापती पदाची निवडूक सोमवारी (दि.२९ मे) झाली. सभापतीपदी गजानन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पाटील यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी वर्णी लागली आहे. सुरेश सावंत (गुहागर ) यांची उपसभापतीपदी निवड झाली. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आपल्या निवडीमागे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, तानाजीराव चोरगे, बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम यांचे योगदान असल्याचे नूतन सभापती गजानन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMarketबाजारElectionनिवडणूक