रत्नागिरी : रेल्वे स्थानकावर रिक्षा चालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेशोत्सव काळात पोलीस कर्मचारी तैनात ठेवणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी विभुते यांनी ही माहिती दिली.या बैठकीत पत्रकारांनी उत्सव काळातच वीज पुरवठा खंडित होतो. मात्र, तो दुरूस्त करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणून दिले. उत्सव काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, आपत्कालिन काळात वीज गेल्यास तत्काळ उपलब्ध करून द्यावी, जनतेशी संवाद ठेवावा, आशा सूचना महावितरणला देण्यात आल्या.याच बैठकीत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रिक्षाचालकांकडून होत असलेल्या लुटीचा मुद्दा पुढे आला, त्यावेळी बोलताना विभुते म्हणाले की, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर गणेशोत्सव काळात बंदोबस्त असणार आहे. रिक्षाचालकांकडून होणाऱ्या पिळवणुकीवर पोलीस लक्ष ठेवतील.
Ganeshotsav : रिक्षा चालकांकडून होणारी लूट थांबणार, गणेशोत्सवकाळात रत्नागिरी पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 4:11 PM
रेल्वे स्थानकावर रिक्षा चालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेशोत्सव काळात पोलीस कर्मचारी तैनात ठेवणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.
ठळक मुद्देरिक्षा चालकांकडून होणारी लूट थांबणार गणेशोत्सवकाळात पोलिसांची करडी नजर