शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शहरातील कचरा समस्या बनलीय डोकेदुखी

By admin | Published: June 18, 2015 9:46 PM

रत्नागिरी पालिका : पालिकेच्या सभा गाजवूनही समस्या ‘जैसे थे’च

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील कचऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून, अद्याप ही समस्या सोडविण्यात पालिकेला यश आलेले नाही. एकीकडे साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत, तर शहरातील कचराही वेळच्या वेळी उचलला जात नसल्याच्या प्रश्नावरून पंधरा दिवसांपूर्वीच्या सभेत नगराध्यक्षांना सर्वच सदस्यांनी घेरूनही शहरातील कचऱ्याची समस्या सुटलेली नाही. अनेक ठिकाणी घंटागाडीच जात नसल्याच्या तसेच कचरा आठ-आठ दिवस उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. रत्नागिरी शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असताना शहरात ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे, त्यामध्ये शहर स्वच्छतेला महत्त्वाचे स्थान आहे. शहरात दररोज २२ टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे संकलन करून तो साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकला जातो. ढीग जसे वाढत जातात तसे त्या ढीगांना आग लावून देण्याचे प्रकार सुरू होतात. मात्र, आग लावल्याने कचऱ्याचे ढीग काही कमी झालेले नाहीत. त्यातच घनकचरा प्रकल्पाचा विषय रखडला असल्याने कचऱ्याचे काय करावे, असा प्रश्न पालिका प्रशासनासमोरही आहे. पालिकेतील कारभारीही त्याबाबत आपली हतबलता दाखवित आहेत. परंतु ही हतबलता नागरिक अजून किती खपवून घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घनकचरा प्रकल्पाचा विषय मार्गी लागलेला नाहीच, परंतु शहरातील कचरा संकलनाबाबतही योग्य नियोजन नसल्याने शहरात अनेक ठिकाणी कचराच उचलला जात नाही, ्र्रअशी स्थिती आहे. त्यामुळे सफाई कामगार काम करतात की नाहीत, सफाई कामगार पुरेसे आहेत की नाहीत, यांसारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. कागदोपत्री पालिकेकडे ६२ कायमस्वरुपी सफाई कामगार आहेत. शंभरपेक्षा अधिक कंत्राटी सफाई कामगार आहेत. कायम कामगारांमधील केवळ १७ ते १८ कामगारच हजर असतात. त्यामुळे शहर सफाईचे काम योग्यरित्या होणार कसे, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे. शहराचे २८ वॉर्ड असून, नवीन रचनेनुसार ७ प्रभाग करण्यात आले आहेत. शहरातील काही जवळच्या प्रभागात कचरा संकलनाचे काम होते. मात्र अन्य ठिकाणी कचराच उचलला जात नाही, अशा तक्रारी नागरिकांतून केल्या जात आहेत. नगरसेवकांनीही याच तक्रारी करूनही सफाईचे काम योग्यरित्या होत नसल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरी पालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष म्हणून आपण कारभार पाहताना शहरातील स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले होते. सफाई कामगारांचे नियोजन योग्यरित्या झाले की नाही, याची आपण सकाळी ६ वाजल्यापासूनच स्वत: तपासणी करीत होतो. त्यामुळे त्यावेळी अत्यंत चांगल्या प्रकारे स्वच्छतेचे काम सुरू होते. आता सफाई कामगारांची संख्या किती व प्रत्यक्षात कामावर असतात किती, हा संशोधनाचा विषय आहे. स्वच्छतेचे काम योग्यरित्या होत नाही, हे सर्व नगरसेवकांचे म्हणणे योग्य आहे. कामात सुधारणा आवश्यक आहेत. - मिलिंद कीर, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, रत्नागिरी.