शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
5
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
6
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
7
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
8
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
9
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
10
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
11
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
12
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
14
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
15
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
16
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
17
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
18
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
19
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
20
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी

Ratnagiri: विकासकामांच्या प्रशासकीय मान्यता लवकर घ्या, पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश 

By अरुण आडिवरेकर | Published: July 25, 2024 5:51 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संभाव्य दौऱ्यामध्ये विकासकामांबाबत लोकार्पण, भूमिपूजन करण्यात येणार

रत्नागिरी : जिल्हा नियोजनमधून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या प्रस्तावाला सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घ्यावी. त्यानंतर जिल्हा नियोजन कार्यालयाने तातडीने निधी वितरित करावा. हा निधीही वेळेत खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.संभाव्य मुख्यमंत्री दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विकासकामांच्या अनुषंगाने गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.मंत्री सामंत यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, विमानतळ, प्रांत कार्यालय भूमिपूजन, मिनी थिएटर, लोकमान्य टिळक स्मारक लोकार्पण या याेजनांबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी मंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मंत्री सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संभाव्य दौऱ्यामध्ये विकासकामांबाबत लोकार्पण, भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी जबाबदारीने आणि गतीने ही कामे मार्गी लावावीत. त्याचबरोबर या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबतही संबंधित यंत्रणेने कार्यवाही पूर्ण करावी.महसूल सप्ताहात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात मोठा कार्यक्रम घ्यावा. त्यामध्ये लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबतही सर्व विभाग प्रमुखांनी लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनीही विविध यंत्रणांकडून कामांबाबतचा आढावा घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतPlanning Commissionनियोजन आयोग