रत्नागिरी : प्रेमाचा दिन म्हणून दि.१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील गिफ्टशॉपी सजल्या आहेत. गुलाबी, लाल रंगाचे पिलो, फुले, भेटवस्तू, शिवाय चॉकलेट्स विक्रीस आली आहेत.प्रेमाचा दिन साजरा करीत असताना, या दिवशी युवक, युवती आपल्या प्रेमींना भेट देतात, शिवाय पतीपत्नीही एकमेकांना भेटी देत असतात. परगावी राहणाऱ्यांसाठी प्रेमाचे संदेश देण्याकरिता भेटकार्डही उपलब्ध आहेत. २० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंतची ग्रिटींग्ज कार्ड बाजारात उपलब्ध आहेत. हार्टशेप पिलो, लिपशेप पिलोही विक्रीस उपलब्ध आहेत. प्रेमाची अभिव्यक्ती करण्यासाठी गुलाबी, लाल रंगाचे वेलवेटचे छोट्या मोठ्या आकारातील पिलो एकमेकांना देण्यात येतात. २५० रुपयांपासून २,५०० रुपयांपर्यंत पिलोच्या किमती आकारानुसार सांगण्यात येत आहेत.गिफ्टशॉपीच्या बाहेर अडकविण्यात आलेले पिलो ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत, याशिवाय अन्य भेटवस्तूही विक्रीस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, कृत्रिम गुलाबाची फुले शिवाय गुलाबाच्या फुलांमध्ये अंगठीची डबी असलेली फुले यांनाही मागणी होत आहे. त्याचप्रमाणे, विविध कंपन्यांची चॉकलेट्स बाजारात विक्रीस आली आली आहेत. चॉकलेट्सच्या गिफ्ट पॅकिंग्जना अधिक मागणी होत आहे.खास लग्नसोहळे
दि.१४ फेब्रुवारीला लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लग्नसोहळे खास व्हॅलेंटाइन दिवशी आयोजित केले आहेत. मात्र, त्यासाठी सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पालकांनीही परवानगी देत नियोजन केले आहे