रत्नागिरी : अत्यावश्यक सेवेत फिरणाऱ्यांनाच पेट्रोल देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत. त्यानुसार, प्रत्येक पेट्राेलपंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहनधारकांचे ओळखपत्र पाहून साेडण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध जाहीर केले आहेत. अनावश्यक घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध अधिक कडक करत, जिल्हाधिकारी यांनी अनावश्यक फिरणाऱ्यांचे पेट्रोलही बंद केले आहे. अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना पेट्रोल न देण्याच्या सूचना पेट्रोल पंप मालकांना दिल्या आहेत, तसेच जे नागरिक अत्यावश्यक सेवेमध्ये आहेत अशा लोकांनाच त्यांची ओळखपत्र तपासूनच पेट्रोल द्यावे, असे आदेश दिले आहेत. पेट्रोल पंप हे सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश मिश्रा त्यांनी दिले आहेत.
.............................
रत्नागिरी शहरातील माळ नाका येथील पेट्रोल पंपावर ओळखपत्र तपासूनच पेट्राेलसाठी गाड्या साेडण्यात येत आहेत. (छाया : तन्मय दाते)