रत्नागिरी : येथील ‘सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल, धनजी नाका शाळेची विद्यार्थिनी त्रिशा मयेकर हिला राज्य शालेय तायक्वॉंदो स्पर्धत सुवर्ण पदक मिळाले असून तिची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच येथील जीजीपीएस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थीनी राधिका जाधव हिला रौप्य पदक मिळाले आहे. मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्रिशा गुरूवारी रवाना झाली.क्रीडा व यूवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद लातूर द्धारा आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्यॉंदो स्पर्धत गणराज तायक्वॉडो क्लब रत्नागिरीची त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिने राज्यस्तरीय शालेय तायक्यॉंदो स्पर्धत (१७ वर्ष मुली) वजनी गट ४४ किलो खालील गटात सुवर्ण पदक तसेच राधिका निशा दर्शन जाधव हिने राज्यस्तरीय शालेय तायक्यॉंदो स्पर्धत (१९ वर्ष मुली) वजनी ५२ किलो गटात रौप्य पदक मिळविले आहे.
मध्य प्रदेशमध्ये बैटूल येथे ३० डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ या कालावधीत होणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वाॅंदो स्पर्धेसाठी त्रिशाची निवड झाली आहे.त्रिशा आणि राधिका या दोघींनी आजपर्यंत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष ठसा उमटवला आहे. या स्पर्धेकरता गणराज तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष प्रशांत मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक आराध्या मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्रिशा व राधिका यांना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे तसेच अन्य जिल्हा व तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.