शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

महामार्गावर ६८.४२ लाखांच्या विदेशी मद्यासह ९२.६२ लाखांचा माल जप्त

By शोभना कांबळे | Published: May 26, 2023 2:17 PM

चिपळूण उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी.

रत्नागिरी : अवैद्य मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क्‌ विभागाकडून गस्ती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिपळूण विभागाकडून राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी करताना चिपळूण रेल्वे स्टेशन फाटयाजवळ ६८.४२ लाखांचे विदेशी मद्य तसेच वाहन, कोळसा पावडर, मोबाईल आदींसह ९२,६२,५०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई २५ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाला मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार २५ रोजी वालोपे गावच्या हद्दीत चिपळूण रेल्वे स्टेशन फाटयाजवळ सापळा रचला. दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास चिपळूणकडून पनवेलच्या दिशेने येणा-या पांढ-या रंगाचा संशयित ट्रकाची (क्र. एमएच ०९-एफ एल ५७२४) झडती घेतली असता मागच्या बाजूला सुमारे २० किलो क्षमतेच्या कोळसा पावडरने भरलेल्या एकूण १२५ पोलीथीन गोणी तसेच त्यांच्या आड कागदी पुठ्याचे बॉक्स दिसले. त्या बॉक्समध्ये ऑरेंज फ्लेवर वोडका आणि ग्रीन अँपल वोडका या दोन ब्रॅंडच्या (७५० मिली क्षमतेच्या) एकूण ९५० बाॅक्समध्ये  ९९,४०० सीलबंद बाटल्या आढळल्या.

या विदेशी मद्याची अंदाजे किंमत ६८, ४०,००० रूपये व ट्रकची अंदाजे किंमत २४ लाख,  कोळसा पावडर (९९,५०० रूपये) व ९० हजार रूपये किंमतीचा मोबाईल असे एकूण ९२,६२,५०० रूपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. या मद्याच्या बाटल्यांवरील लेबलबरील तपशील तपासले असता बोगस कागदपत्रांच्या आधारे गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात विदेशी मद्याची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनात आले तसेच या मद्याचे उत्पादनही गोवा राज्यातच झालेले आहे. विदेशी मद्याचा साठा विना परवाना बेकायदेशीपणे महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून वाहतूक करीत असल्याचे दिसून आल्याने या ट्रकचालक सुरेश हरिबा पाटील (रा. शिवाजीनगर कडेगाव ता. कडेगाब जि.सांगली) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्‍त डॉ.विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण यांच्या आदेशान्वये तसेच कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त श्रीविजय चिंचाळकर, रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाचे निरीक्षक व्ही.एस.मासमार दुय्यम निरीक्षक जयसिंग खुटावळे, गणेश नाईक, सहा.दुय्यम निरीक्षक राजेंद्र भालेकर, जवान सावळाराम वड यांनीही कामगिरी केली. यासाठी तुषार शिवलकर व सिद्धार्थ जाधव यांचे सहकार्य मिळाले. अधिक तपास निरीक्षक व्ही.एस.मासमार करीत आहेत.अवैध विदेशी मद्याची वाहतूक करण्यामागे मुख्य सुत्रधार कोण आहे? याबाबत चालक सुरेश पाटील याची कसून चौकशी केली असता, त्याचा पुतण्या ओंकार हनमंत पाटील (रा. मलकापूर अहिल्यानगर ता. कराड जि.सातारा) हा सर्व व्यवहार करीत असल्याचे समजले.