चिपळूण : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या धर्तीवर केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाने संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याची मोहीम शासकीय यंत्रणेने हाती घेतली आहे. त्याला आता विविध संघटना व नागरिकांचेही योगदान लाभत आहे. काल (मंगळवारी) उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विरेश्वर कॉलनी परिसर स्वच्छ केला. सकाळी प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या विरेश्वर कॉलनी, विरेश्वर तलाव व विरेश्वर मंदिराचा परिसर शासकीय अधिकारी, कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साफ केला. विरेश्वर तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी खासदार फंडातून निधी खर्च करण्यात आला आहे. या तलावाच्या भोवतालचा परिसर हा मॉर्निंग वॉकसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वापरला जातो. हा परिसर स्वच्छ असावा, तळ्यातील गाळ काढावा व विरेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करण्याच्या हेतूने ही मोहीम या भागात राबविण्यात आली. उपविभागीय अधिकारी हजारे यांच्याबरोबर तहसीलदार वृषाली पाटील, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नगरसेवक सुचय रेडीज, नगरसेवक शशिकांत मोदी, कैसर देसाई, महेश दीक्षित, स्वच्छता निरीक्षक अनंत हळदे, अशोक साठे, महसूलचे सर्व कर्मचारी, नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, डी. बी. जे. महाविद्यालयाचे विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. चिपळूण एस. टी. स्टॅण्डच्या मागील परिसरही या पथकाने स्वच्छ केला.या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांचे उपविभागीय अधिकारी हजारे यांनी आभार मानले. ही चळवळ यापुढे अखंड सुरु ठेवावी, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)भारत सरकारच्या आवाहनाला शासकीय यंत्रणेने प्रतिसाद दिला आहे. पण, नागरिकांनीही यात सहभाग घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. स्वच्छ भारत अभियान ही चळवळ शासकीय अधिकाऱ्यांसाठी नाही तर ती सर्वसामान्यांसाठी आहे, याची जाणीव नागरिकांनीही ठेवायला हवी. तसे घडले तरच हे अभियान यशस्वी होणार आहे.परिसर स्वच्छतेसाठी उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील यांनी घेतली हाती झाडू.विरेश्वर तलाव व परिसरातील उद्यान स्वच्छ केल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दिलासा. विरेश्वर मंदिर, विरेश्वर तलाव व विरेश्वर कॉलनी परिसर झाला चकाचक चिपळूण नगर परिषद कर्मचारी, डी. बी. जे. महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी घेतली मेहनत. चिपळूण शहरातील विरेश्वर कॉलनी येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, कैसर देसाई, नगरसेवक शशिकांत मोदी, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी पुढाकार घेऊन साफसफाई केली.
विरेश्वर तलाव स्वच्छतेसाठी शासकीय यंत्रणा सरसावली
By admin | Published: November 12, 2014 9:18 PM