शोभना कांबळे/रत्नागिरी :रत्नागिरीविमानतळाच्या विस्तारिकरणांतर्गत शहरानजिकच्या तिवंडेवाडी व मिरजोळे (ता. रत्नागिरी) येथील १९.०१ हेक्टर आर क्षेत्राचे भारतीय तटरक्षक दल, रत्नागिरी यांच्याकडे हस्तांतरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मंगळवार, दि. १३ जून, रोजी शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला आहे.
शासनाने रत्नागिरी विमानतळ विकासासंदर्भात जमीनीचे भूसंपादन करणे व त्यासाठी आवश्यक निधीस प्रशासकिय व वित्तीय मान्यता शासन ९ मे २०१८ रोजी दिली आहे. तसेच, रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी या विमानतळाच्या तिवंडेवाडी व मिरजोळे येथील एकूण क्षेत्र २७.९९.५९ हेक्टर आर.चौरस मीटर संपादन करण्याच्या अनुषंगाने ४ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु.९७.४४ कोटी रूपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली होती.
केंद्र शासनाच्या प्रादेशिक दळणवळण योजना (Regional Connectivity Scheme) अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आलेला आहे. हे विमानतळ भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. या विमानतळाची सद्यस्थितीतील धावपट्टी १३७२ मीटर (४५०० फूट) लांबीची आहे. तथापि,या योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळ Bombardier / ATR 72 प्रकारची विमाने वाहतुकीसाठी व इतर अनुषंगिक सेवा पुरविण्यास सक्षम व्हावा, यादृष्टीने या धावपट्टीची लांबी वाढवून ती २१३५ मीटर (७००० फूट) करण्याची मागणी तटरक्षक दलाने केली होती.
याखेरीज, रत्नागिरी विमानतळावरुन सुरक्षित नागरी विमान वाहतूक व्हावी, यादृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या धावपट्टीच्या पश्चिमेला मिरजोळे विमानतळ विकासासंदर्भात जमिनीचे भूसंपादन करणे व त्यासाठी आवश्यक निधीला प्रशासकिय व वित्तीय मान्यता शासन २०१८ सालीये देण्यात आली आहे.
तसेच, रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी या विमानतळाच्या तिवंडेवाडी व मिरजोळे रत्नागिरी येथील एकूण क्षेत्र २७.९९.५९ हेक्टर आर.चौरस मीटर संपादन करण्याच्या अनुषंगाने ४ ऑक्टोबर, २०२२ रोजी ९७.४४ कोटी रूपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे रत्नागिरी विमानतळाची क्षमता वाढीस मदत होणार आहे.