रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या शहरातील देव-घैसास कीर कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भारत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. अलिमिया परकार होते.
या वेळी डाॅ. किशोर सुखटणकर, शिक्षणतज्ज्ञ डाॅ. सुभाष देव, रमेश कीर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रगीत, दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मधुरा पाटील यांनी केले. यानंतर उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. प्राजक्ता राड्ये, सुप्रिया देसाई या विद्यार्थ्यांनी मनाेगत व्यक्त केले. मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. अनन्या धुंदूर यांनी तर आभार प्रा. विनय कलमकर यांनी मानले. संस्थेचे सचिव सुनील ऊर्फ दादा वणजू, उपकार्याध्यक्षा नमिता कीर, चंद्रकांत घवाळी व इतर पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
.........
फोटो मजकूर
रत्नागिरी शहरातील देव-घैसास कीर कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी पदवी प्रदान उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी डाॅ. अलिमिया परकार, डाॅ. किशोर सुखटणकर, डाॅ. सुभाष देव, रमेश कीर, प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील आदी उपस्थित होते.