शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

कडवईची ग्रामसभा विविध विषयांवर वाजली

By admin | Published: December 01, 2014 9:32 PM

ग्रामस्थ आक्रमक : गावविकास आराखडा तयार करताना स्थानिकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा विविध विषयांवर चांगलीच वाजली. या ग्रामसभेला संगमेश्वरच्या सभापती मनीषा गुरव, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य संतोष थेराडे हे उपस्थित होते. या ग्रामसभेत घरकुल, पर्यावरण विकास आराखडा तसेच वाढीव घरपट्टी या विषयांवर वादग्रस्त चर्चा झाली.कडवई ग्रामपंचायत कार्यालय येथे ऐश्वर्या घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेला पर्यावरण विकास आराखडा तयार करणाऱ्या सातारा येथील संस्थेचे सभासद हजर होते. २०१० साली या संस्थेची नियुक्ती कडवई गावचा विकास आराखडा तयार करण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, या संस्थेने ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा आराखडा तयार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे या संस्थेला आवश्यक असणारा ग्रामसभेचा ठराव देण्यास ग्रामस्थांनी स्पष्ट नकार दर्शवला. पंचायत समिती सदस्य संतोष थेराडे यांनी हा ठराव देण्याची विनंती ग्रामस्थांना केली. मात्र, वॉर्डसभा झाल्याखेरीज ठराव न देण्याचे स्पष्ट मत ग्रामस्थांनी मांडले.घरकुल योजनेत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे मत ग्रामस्थांनी सभापतींसमोर मांडले. ज्यांना खरोखरच निवाऱ्याची आवश्यकता आहे, अशा लोकांना घरे न मिळता धनदांडगे लोक या योजनेचा लाभ घेत असल्याचे ग्रामस्थांनी उघड केले. यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन सभापती मनीषा गुरव यांनी ग्रामसभेत दिले.कडवई परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार होत असून, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. याच सभेमध्ये शिंदेआंबेरी येथील खसासेवाडी स्मशानभूमीचे काम न करता रक्कम अदा झाल्याची बाब ग्रामस्थांनी मांडली. यावर ग्रामविकास अधिकारी विनायक राजेशिर्के यांनी स्मशानाच्या आराखड्याची रक्कम अदा झाली असल्याचे सांगितले. मात्र, काम न करता रक्कम का अदा करण्यात आली, याचे समाधानकारक उत्तर त्यांना देता आले आही. काम पूर्ण असल्याचा दाखला बांधकाम विभागाने दिल्याने ही रक्कम अदा केली असल्याचे आश्चर्यकारक उत्तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. काम न करता काम पूर्ण झाल्याचा दाखला देऊन रक्कम अदा होत असेल तर हा जनतेच्या पैशांचा अपहार आहे, असा आक्षेप ग्रामस्थांनी नोंदवला. याची चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई व्हावी, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. फौजदारी कारवाईवर ग्रामस्थ मागणीवर ठाम राहिल्यानंतर अखेर हा ठराव संमत करण्यात आला. दोन सभापतींच्या उपस्थितीत झालेली ग्रामसभा विविध विषयांवर चांगलीच गाजली. (वार्ताहर)संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेबद्दल औत्सुक्य होते. यावेळी गाव परिसरातील अनेक विषयांवर चर्चा झाली असली तरी धनदांडग्यांनी गरिबांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊ नये, असे मत व्यक्त करण्यात आले. विकास आराखडा, बिबट्याचा बंदोबस्त, घरकूल हे विषय टिपेचे ठरले. विशेष ग्रामसभा गाजली ती घरकूल, पर्यावरण विकास आराखडा या विषयांवर. सातारच्या संस्थेबाबत ग्रामस्थांचा आक्षेप. विश्वासात न घेता आराखडा तयार केल्याचे म्हणणे. गरजू लाभार्थींपर्यंत घरकूल योजना पोहोचली नसल्याची खंत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी.