रत्नागिरी : जिल्ह्यांमध्ये विकास कामासंदर्भात, तसेच येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक, वैयक्तिक तक्रारी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभागाकडे केल्या जातात. १३ महिन्यांच्या कालावधीत अनेक तक्रारी आल्या होत्या. जिल्हा परिषद ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मरभळ यांनी ५४५ तक्रारींचे निवारण केले आहे.
श्रमदानातून स्वच्छता
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कडवई-तुरळ रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अपघाताचा धोका निर्माण झाल्याने स्वराज्य संघटनेच्या सभासदांनी श्रमदान करून साफसफाई केली. कडवई-तुरळ रस्त्यावर गटारांच्या चुकीच्या नियोजनामुळे चिखल पसरला होता.
कृषी कार्यशाळा
चिपळूण : तालुका कृषी कार्यशाळेंतर्गत सुरू झालेल्या कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत दादर येथील शेतकऱ्यांसाठी कृषी शाळा आयोजित करण्यात आली होती. दि. १ जुलैपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहे. एसआरटी चारसूत्री भात लागवड, खत व्यवस्थापन, रासायनिक खताची बचत, शेणखत, कंपोस्ट खत, गिरीपुष्प याबाबत माहिती देण्यात आली.
वर्धापन दिन साजरा
चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीचा ५६वा वर्धापन दिन कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून साजरा करण्यात आला. विद्यमान अध्यक्ष श्रीधर भिडे, उपाध्यक्ष श्रीराम खरे, पद्माकर सावंत, प्रकाश जोशी, व्हाइस चेअरमन ॲड.जीवन रेळेकर आदी उपस्थित होते.