रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या रहिवाशांना तसेच वाहनचालकांना होणाऱ्या त्रासवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची चांगलीच कान उघाडणी केल्यानंतर या महामार्गावरच्या डांबरीकरणाचे तसेच पॅचवर्कचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन कंत्राटदारांनी पालकमंत्री यांना दिले.गेल्या वर्षभरापासून मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चार विविध कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले. या कंपन्यांना त्या त्या रस्त्यांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना तेथील रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.
विविध दौऱ्यावेळी तसेच गणेशोत्सवावेळी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराबरोबर बैठका घेऊन या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेतही यासंदर्भात पालकमंत्री वायकर यांनी मंत्रालयात बैठका घेतल्या होती.कोकणात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे या महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील रस्त्यांची फारच दयनिय अवस्था झाली आहे. जिल्ह्याचा दौरा केला असता त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली.
स्थानिक जनतेनेही या महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाºया त्रासाची माहिती पालकमंत्री वायकर यांना दिली. याची गंभिर दखल घेत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी सकाळी मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची खेड येथील निवासस्थानी बैठक घेतली.या बैठकीला खेडचे प्रांत सोनावणे त्याचबरोबर खेड तसेच चिपळुण येथील कंत्राटदार हजर होते. या बैठकी कशेळी ते चिपळुण लोटे या महामार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर पालकमंत्री वायकर यांनी तीव्र शब्दात कंत्राटदारांची कानउघाडणी केली.
या महामार्गावरील डांबरीकरणाचे तसेच पॅचवर्कचे काम सुरू करण्याचे निर्देश वायकर यांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार कशेळी ते चिपळूण लोटे महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.