लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : तालुक्यातील पालेगाव रस्त्यावर पालेकोंड शाळेच्या आवारातील गुलमोहराचे मोठे झाड साेसाट्याच्या वाऱ्यामुळे मुळापासून उन्मळून रस्त्यावर पडले. त्यामुळे मुख्य रस्त्यापासून गावात जाणारा रस्ता पूर्णतः बंद झाला.
यामुळे शाळेच्या संरक्षक भिंतीचे मोठे नुकसान झाले असून, भिंत कोसळली. वाहतूक बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
पाले ग्रामपंचायतीचे उपसरपंच
नीलेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेत ग्रामसेवक डी. कुवर यांना कटर उपलब्ध करण्यास सांगितले. मंडणगड येथून कटर आणून झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला. झाड बाजूला करण्यासाठी उपसरपंच नीलेश जाधव, ग्रामसेवक डी. कुवर, विनायक हंबीर, रवींद्र मनवे, विश्वनाथ खांबे, भिकू माळी, संदीप डोंगरे आदी
ग्रामस्थांनी मेहनत घेतली. शाळेच्या नुकसान झालेल्या संरक्षक भिंतीचा
पंचनामा करण्याची सूचना उपसरपंच जाधव यांनी ग्रामसेवकांनी केली.
------------------------
मंडणगड तालुक्यातील पाले येथे रस्त्यावर पडलेले झाड उपसरपंच नीलेश जाधव, ग्रामसेवक डी. कुवर व ग्रामस्थांनी कापून बाजूला केले.