रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे आयोजित विद्यापीठ महिला लंगडी स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या संघाने सुवर्णपदक मिळवले आहे. महाविद्यालयास सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.विद्यार्थिनींच्या संघात पल्लवी रांबाडे, मंजिरी रेवाळे, शिल्पा घाणेकर, श्रध्दा पवार, नम्रता पवार, अपर्णा रांबाडे, अमृता मयेकर, धनश्री आंब्रे, कल्पना भोसले, शीतल वाडेकर, सोनाली सुर्वे, प्रतिक्षा साळवी, प्रियांका चव्हाण, सनम शेलार, प्रणाली वीर सहभागी झाल्या होत्या.विजेत्या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. विनोद शिंंदे यांचे मार्गदर्शन तर प्रा. चंद्रकांत घवाळी, स्वप्नील पाटील व लीना घाडीगांवकर यांचे मार्गदर्शन लाभले. संघातील खेळाडूंचे रत्नागिरी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, कार्यवाह अॅड. प्राची जोशी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, जिमखाना विभागाचे अध्यक्ष डॉ. मकरंद साखळकर यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने पदक मिळवले होते. सलग दुसऱ्यावेळी हा पराक्रम झाला आहे. (प्रतिनिधी)
लंगडीत गोगटे-जोगळेकरला सुवर्णपदक
By admin | Published: February 13, 2015 10:08 PM