शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

तरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:38 PM

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३.२९ टक्के आहे.

ठळक मुद्देतरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार३० ते ४९ वयोगटात अधिक मतदार, यंदा एकूण १३ लाख ०६ हजार २५८ मतदार

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३.२९ टक्के आहे.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरीचा कार्यभार स्वीकारताच मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, नवमतदारांनी मतदानासाठी पुढे यावे, यादृष्टीने उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही २०१४ च्या तुलनेने अधिक मतदार होते.यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात १३ लाख ०८ हजार ८०० मतदार निश्चित झाले आहेत. यापैकी ६ लाख २६ हजार ९०६ एवढे पुरूष तर ६ लाख ८१ हजार ४८४ एवढी महिला मतदारांची संख्या आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी १२ लाख ३९ हजार २०१ एवढे मतदार होते. यावर्षी त्यात ६९ हजार ५९९ने वाढ झाली आहे.दिनांक १ जानेवारी २०१९च्या अर्हतावर आधारित प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार, एकूण मतदारांची संख्या १३ लाख ६ हजार ५२८ इतकी असून, त्यातील ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या २ लाख ७५ हजार ३७९ इतकी आहे तर त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदार २ लाख ५३ हजार ४४८ इतके आहेत. ८० वर्षावरील मतदारांची संख्या केवळ १.७८ टक्के (५५ हजार ६८९) इतकी आहे.सध्या जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तरूण मतदारांमध्ये जागृतीचे काम सुरू आहे. त्यामुळे या मतदारांच्या संख्येत वाढ होत आहे. १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या ३० हजार असली तरी २० ते २९ या वयोगटातील तरूण मतदारांची संख्या १४ टक्के म्हणजेच २ लाख २६ हजार २६४ इतकी आहे.नवमतदारांमध्ये आता मतदानाच्या हक्काबाबत जागृती निर्माण होत आहे. २४ सप्टेंबरपर्यंत मतदारांना नावनोंदणी करण्याची संधी आहे. यामुळे नवीन मतदारांमध्ये वाढ होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदारांची संख्या वाढणार आहे.प्रशासनाचे उपक्रममतदारांमध्ये जागृती वाढावी, तसेच नवमतदारांमध्येही मतदानाच्या हक्काबाबत जाणीव निर्माण व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम रागविले जात आहेत. सध्या जिल्हाभर व्हीव्हीपॅट मशीन तसेच मतदान प्रक्रियेबाबत माहिती व्हावी, यासाठी गावोगावी जावून प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत.२४ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणीची संधीविधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी २४ सप्टेंबरपर्यंत मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळाली आहे. या मतदारांना २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत हक्क बजावता येणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी