रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शासकीय नियमावलीचे पालन करीत जिल्ह्यात श्री हनुमान जयंती उत्सव शांततेत साजरा करण्यात आला. मंदिरात पुजाऱ्यांच्याहस्ते पूजा करण्यात आली, पण भाविकांना दर्शनासाठी मंदिरे बंदच ठेवण्यात आली आहेत.
दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त मंदिरातून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जन्मोत्सव, पूजा, कीर्तन तसेच श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. गतवर्षीही हनुमान जयंतीवेळीच लाॅकडाऊन असल्याने उत्सव शांततेत साजरा करण्यात आला होता. यावर्षीही उत्सव शांततेत साजरा करण्यात आला. लाॅकडाऊनमुळे भाविकही घरीच असल्याने घरातच श्री मारुतीची पूजा करण्यात आली. श्री हनुमान जयंतीनिमित्त व्यायामशाळेतही श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यावर्षी पूजा वगैरे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.