रत्नागिरी : शहरात रस्ते खड्ड्यात की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्तेही नादुरुस्त झाले आहेत. खड्ड्यातून प्रवास करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे अनेकांना मणक्याचे आजार झाले आहेत.
मासेमारी ठप्प
रत्नागिरी : वातावरणात झालेल्या बदलाने समुद्र खवळला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने बहुतांश मासेमारी नौका बंदरातच नांगरावर उभ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे.
मोकाट जनावरे
रत्नागिरी : जिल्ह्यात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. शहरी व ग्रामीण भागातही लोक त्रस्त झाले आहेत. या जनावरांमुळे अनेकदा अपघात होऊन कित्येक जण जखमी झाले आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी
लांजा : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. आता रुग्णांची संख्या फार कमी झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
पुस्तके विक्रीवर परिणाम
रत्नागिरी : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील गेली दोन वर्षे शाळा बंद आहेत. त्यामुळे सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ ऑनलाईन शिकविले जात असल्याने त्याचा परिणाम पुस्तके विक्री व्यवसायावर झाला आहे.