शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

गोई बंधाऱ्याचे जलपूजन

By admin | Published: August 01, 2016 12:17 AM

समाधान : ११३ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आल्यामुळे आनंद

 चांदवड : चांदवड येथे राष्ट्रीय महामार्गाजवळील गोई बंधाऱ्याचे जलपूजन चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक सोनुपंत ठाकरे व कदम माउली यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. पौरोहित्य भूषण दीक्षित यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, शिवसेना गटनेते व नगरसेवक जगन्नाथ राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, इंदूमती वाघ, पार्वताबाई पारवे, शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चना पूरकर, विलास दादा ढोमसे, बाळासाहेब वाघ, प्रशांत ठाकरे, सुनील डुंगरवाल, अनिल कोतवाल, बाळासाहेब कासलीवाल आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर असून, धरण क्षेत्रात वाढ करण्यासाठी परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपदित कराव्या लागणार आहे. यापैकी पूर्वी संपादित केलेल्या जमिनींचीअंदाजपत्रकातील किंमत एक कोटी ६ लाख व इतर कामाची अशी एकूण ती कोटी १० लाख रूपये किंतम होती. परंतु जमिनींच्या किमतीत वाढ झाल्याने सदर कामासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा सांडवा लिकेज असल्याने त्याचे नवीन काम करून लिकेज बंद केल्याने बंधारा पूर्णपणे पाण्याने भरून सांडवा कोरडा पडला आहे. सदर काम हे प्रगतिपथावर असून, पिंचिग व सांडव्याचे काम साधारणत: मार्च २०१७पर्यंत पूर्ण होर्ईल. चांदवड नगर परिषदेच्या हद्दीतील गोई नदीच्या पूर्वेला साधारणत: ७५ टक्के ते पश्मिेला मंगरूळच्या बाजूस २५ टक्के भाग विभागला आहे. याचा फायदा चांदवड, मंगरूळ व जवळपासच्या खेड्यांना होणार आहे. यातून ११३ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असून, परिसरातील शेतकरीवर्ग आनंदित झाला आहे. याचबरोबर चांदवड शहरातील नागरिकांनी येथील पाणी आरक्षित करून चांदवडच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, असे नगराध्यक्ष कासलीवाल यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास बाळासाहेब कबाडे, भगवान अप्पा कबाडे, हेमंत गुरव, गणपत ठाकरे, यमाजी देशमाने, अण्णा शेळके, पंडितराव तांदळे, कैलास कावळे, हांडगे, दिवटे, विशाल ललवाणी, नितीन खैरनार, अशोक अहेर, युवराज अहेर, मनोज शिंदे, प्रभाकर ठाकरे, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन फंगाळ, गणेश पारवे, गणेश शेळके, राहुल हांडगे, शैलेश पवार, राजेंद्र बेलदार, अमोल अहेर, मुफिज शेख, अशोक बनकर, यशवंत बनकर आदिंसह परिसरातील रहिवासी उपस्थित होते. (वार्ताहर)