रत्नागिरी : गणेशोत्सव काळात मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात येत असतात. त्यांच्यासाठी मुंबई - गोवा महामार्गावर सुविधा दिल्या आहेत. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगडमध्ये जाणाºयांनी द्रूतगतीमार्गे खोपोली, पाली मार्गाचा वापर करावा, रत्नागिरीत येणाºयांनी कºहाड - चिपळूण मार्गाचा, तर सिंधुदुर्गला जाणाºयांनी कोल्हापूर, गगनबावडा मार्गे तसेच सावंतवाडीला जाणाºयांनी निपाणी, अंबोली घाट मार्गाचा वापर करावा, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
गणेशोत्सव काळात कोकणात येणाºया भाविकांनी मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच कोकणात येणाºया मार्गावर टोलमाफी करण्यात आली असून, त्यासाठी जवळच्या पोलीस स्थानकात जाऊन पाससाठी माहिती द्यावी, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
कोकणात येणाºया वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमाफी जाहीर केली आहे. टोलमाफीसाठी प्रवाशांनी आपले नाव, वाहनाचे नाव, कोठे जाणार त्या गावाचे नाव आदी तपशील जवळच्या पोलीस स्थानकात द्यावा, असे आवाहनही केसरकर यांनी केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई - गोवा महामार्गाची दुरुस्ती केली असून, त्या कामाची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. या मार्गावर पोलीस, संबंधित जिल्हा प्रशासन व परिवहन विभागातर्फे एकत्रितपणे मदत केंद्र उभारण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडीच्या काळात मदतीसाठी क्रेन, तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी या केंद्राशी संपर्क साधावा, असेही केसरकर यांनी सांगितले.
केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन विभागाने नियोजन केले असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रमवगळून) चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे आभार मानले आहेत.