शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

१८ वर्षांचा खंड पडूनही तो जिद्दीने झाला दहावी उत्तीर्ण

By admin | Published: June 22, 2017 12:30 AM

गतिमंद मुलाचा आदर्श : प्रोत्साहनाला कष्ट अन् मानसिकतेची जोड; आर्थिक दुर्बल तरीही शेवटपर्यंत न डगमगता लढत

शोभना कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शिकण्याची जिद्द असली की प्रयत्नाने यश मिळविता येते, हे ओंकार रामदास डाफळे या गतिमंद मुलाने दाखवून दिले आहे. १८ वर्षांचा खंड पडूनही त्याने हे यश मिळविले. यात त्याच्यासाठी परिश्रम घेणाऱ्या रामकृष्ण सुर्वे अभ्यासवर्गाचा महत्वपूर्ण वाटा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारी मुले शिक्षण सोडून रोजगार मिळवण्यासाठी घराबाहेर पडतात, तर काही मुले शाळा सोडून देतात. पण, त्यांच्या मनात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असते. अशा मुलांसाठी स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष जितेंद्र शिवगण, निवृत्त शिक्षक नाना मुझुमदार आणि सामाजिक कार्यकर्ते संजीव सुर्वे यांच्या प्रयत्नांतून गेल्या अनेक वर्षांपासून कै. रामकृष्ण सुर्वे अभ्यासवर्ग सुरू आहे. या अभ्यासवर्गात १७ नंबरचा अर्ज भरून मुलांना दहावी परीक्षेला बसवले जाते. या अभ्यासवर्गात येऊन दहावी उत्तीर्ण झालेल्या अनेक मुलांना पुढे शिक्षणाच्या तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मंडळाचे कार्यकर्ते तसेच निवृत्त शिक्षक नाना मुझुमदार हे स्वत: या मुलांना मार्गदर्शन करतात, ते कुठल्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत. शहरातील फगरवठार येथे राहणारा आर्थिक दुर्बल घटकांतील आेंकार डाफळे या वर्गात दाखल झाला. गतिमंद असल्याने तो या वर्गात वेगळा वाटत होता. मात्र, मंडळाच्या या केंद्रातील कार्यकर्ते सोनाली डाफळे, दीपाली डाफळे, जितेंद्र शिवगण यांनी त्याला प्रोत्साहीत केले. शिक्षणात मध्यंतरी १८ वर्षांचा खंड पडल्याने त्याला शिकविणे, ही या मंडळींसाठी कसोटीच होती. मध्येच ओंकार आजारीही पडला. त्यामुळे त्याच्या घरच्या मंडळींना आपण त्याला शिक्षणासाठी एवढ्या उशिराने पाठविले, ही चूक केली, असे काही काळ वाटू लागले. त्यांनी या शिक्षकांकडेही तसा राग व्यक्त केला. पण ओंकार स्वत: शिक्षणाबाबत सकारात्मक होता. अखेर या मंडळासोबत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा चौधरी यांनी त्याच्या वडिलांना बोलावून समजूत काढली आणि त्यांच्या या परिश्रमाला यश आले. १८ वर्षांनंतर परीक्षा देऊन ओंकार ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्याचे आणि त्याच्यासाठी मेहनत घेणाऱ्या त्याच्या शिक्षकांचे श्रम सार्थकी लागले. यावर्षी रामकृष्ण सुर्वे या अभ्यासवर्गातील १५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सोनाली डाफळे, दीपाली डाफळे, सुवर्णा चौधरी, कुशल जाधव, अपेक्षा पाटील, सुविधा गाडेकर, पल्लवी पवार, अमोल जाधव यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.