शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

राजीनामा देतो, त्यांनीच पक्ष वाढवावा

By admin | Published: June 12, 2016 11:36 PM

भास्कर जाधव : वाद मिटविण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; सावर्डेतील राष्ट्रवादीच्या बैठकीत वक्तव्य

सावर्डे (जि. रत्नागिरी) : संघटनेत माझे ‘काहींशी’ असलेले वाद हे माझ्यामुळे झालेले नाहीत. त्यामुळे ते मिटविण्यासाठी माझ्याकडे वेळही नाही. अशा क्षुल्लक कामांसाठी मला वेळ नसतो. कुणाला यामुळे त्रास होत असेल, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. ‘त्यांना’च पक्ष वाढवू द्या आणि बघा राष्ट्रवादी किती मजबूत होतो ते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हा नवनियुक्त प्रभारी आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना खडसावले.सावर्डे येथील कॉलेज आॅफ फॉर्मसीच्या सभागृहात रविवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्या वादाबाबत मनोगतातून भाष्य करताना ‘हे वाद मिटले पाहिजेत. अशा वादांमुळे कार्यकर्त्यांची गोची होते. या वादात कार्यकर्ता भरडला जातो’, असे सांगितले.त्यावर उत्तर देताना जाधव म्हणाले, मला राष्ट्रवादीत शरद पवार यांनी मोठे केले आहे, त्यामुळे त्यांचा शब्दच मी प्रमाण मानतो. त्यांच्या मार्गदर्शनाने मी माझे काम प्रामाणिकपणे करीत आहे. त्यांना दिलेला प्रत्येक शब्द मी खरा करून दाखविला आहे. त्यामुळेच त्यांनीही माझ्यावर विश्वास टाकून विविध पदे दिली. जाधव यांचा पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, खेड-दापोलीचे आमदार संजय कदम, प्रांतिक सदस्य नलिनी भुवड, प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, विष्णुपंत सावर्डेकर, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, युवकचे जिल्हाध्यक्ष राजू आंब्रे, विक्रांत जाधव, कुमार शेट्ये, बशीर मूर्तुझा, अजित यशवंतराव, सभापती स्नेहा मेस्त्री, सुभाष मोहिते, सिकंदर जसनाईक, कृष्णा पाटील, मंडणगडच्या नगराध्यक्षा श्रृती साळवी उपस्थित होते. (वार्ताहर)तालुकानिहाय मेळावेयावेळी तालुकानिहाय मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले. ते असे - २० जूनला सकाळी १० ते २ वा. मंडणगड, दुपारी ३ वा. दापोली, २१ जूनला सकाळी १० ते २ वा. खेड, २९ जूनला सकाळी १० ते २ वा. राजापूर, दुपारी ३ वाजता लांजा, ३० जूनला सकाळी १० ते २ वा. संगमेश्वर, २ जुलैला सकाळी १० वा. चिपळूण, ३ जुलैला गुहागर येथे सकाळी ११ वा. तालुका व जिल्हा शिबिर.तालुकानिहाय मेळावे घेणारसत्तेबाहेर राहून संघटना बांधणी मजबूत करा. तालुकाध्यक्षांनी तालुक्यात जाऊन तेथील पक्षवाढीसंदर्भात आढावा घ्यावा. येईल त्या व्यक्तीला पक्षात सामील करून आगामी निवडणुकीत पक्षाचा कार्यकर्ता पदावर बसवा आणि गावचा विकास करा, असे सांगतानाच तालुकानिहाय संघटनात्मक बांधणीसाठी मेळावे घेऊन जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मजबुतीकरण करून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया, असे आवाहन त्यांनी केले. पक्षवाढीसाठी कामाला लागाआमदार जाधव मार्गदर्शन करताना म्हणाले की, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार, माझ्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद पुन्हा एकदा वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागावे. विरोधी पक्षाच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत विविध विकासात्मक कामांना खीळ घालून अनेक क्षेत्रात राज्याला मागे नेले आहे. पायाभूत सुविधा, तसेच तत्सम संबंधित योजना बंद करून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ मांडला आहे, असा आरोपही जाधव यांनी केला.