रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले असून, तोणदे (ता. रत्नागिरी) गावातील शंकराच्या स्वयंभू श्री सांब मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.जिल्ह्यात १८ व १९ जुलै राेजी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली हाेती. मात्र, गेले दाेन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने पाणी पातळीत घट झाली हाेती. मात्र, शुक्रवारी (२१ जुलै) रात्रीपासून पावसाचा जाेर वाढला आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी वाढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून, नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये पसरले आहे. त्यामुळे शेती जलमय झाली आहे.ताेणदे गावात शंकराचे पुरातन स्वयंभू सांब मंदिर आहे. हे मंदिर काजळी नदीकिनारी वसलेले आहे. या मंदिराला काजळी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. मंदिराच्या सभाेवताली पुराचे पाणी साचल्याने मंदिरात जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. हाेडीच्या आधारे या भागातील ग्रामस्थ मंदिरात ये-जा करतात. गतवर्षी श्रावणात हरिनाम सप्ताहाच्या काळात मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला हाेता. त्यावेळी ग्रामस्थांनी हाेडीतून जाऊन मंदिरात हरिनाम सप्ताह साजरा केला हाेता.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, तोणदेतील सांब मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
By अरुण आडिवरेकर | Published: July 22, 2023 1:44 PM