रत्नागिरी - मध्य-दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम रेल्वेमधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १३ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा फटका गाड्यांना बसला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द करण्याची वेळ आली आहे. तर अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक अजूनही कोलमडलेले आहे.
९ ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणाऱ्या व १० ऑगस्ट रोजी कोकण रेल्वेवरून जाणाऱ्या १२४३१ राजधानी व १६३३८ ओखा एक्स्प्रेस, १० ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणाऱ्या व ११ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वेवरून जाणाऱ्या १२२१७ कोचुवेली - चंदीगड, २२६५३ निझामुद्दीन, १६३४६ नेत्रावती एक्स्प्रेस, १२ ऑगस्टला कोकण रेल्वेवरून जाणारी १६३४५ डाऊन नेत्रावती, १२ ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणाऱ्या व १३ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे वरून जाणाऱ्या ११०९७ पुणे - एर्नाकुलम, १२६१८ डाऊन मंगला, २२६६० डेहराडून - कोचुवेली, १३ ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणारी व १४ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वेवरून जाणारी २२१४९ एर्नाकुलम - पुणे, १२ ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणाऱ्या व १३ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वेवरून जाणाऱ्या २२१५० पुणे - एर्नाकुलम, १२२१८ चंदीगड - कोचुवेली, १६ ऑगस्टला मूळ स्थानकावरून सुटणारी व १७ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वेवरून जाणारी २२१४९ एर्नाकुलम - पुणे या गाड्यांचा समावेश आहे.
मंगला एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोंकण कन्या, नेत्रवती एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस, कोचुवेल्ली-मुंबई एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस या गाडय़ा शुक्रवारी (८ ऑगस्ट) जवळपास एक ते पाच तास उशिरा धावत होत्या. तसेच कारवार-यशवंतपूर एक्सप्रेस, मुंबई-करमळी एसी एक्सप्रेस, करमळी-मुंबई एसी एक्सप्रेस, पुणो-एर्नाकुलम एक्सप्रेस, एर्नाकुलम-पुणो एक्सप्रेस, हापा-मडगाव एक्सप्रेस, मडगाव-हापा एक्सप्रेस, मडगाव-मेंगलोर एक्सप्रेस, कन्नूर-कारवार एक्सप्रेस, कारवार - यशवंतपूर एक्सप्रेस, यशवंतपूर-कारवार एक्सप्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या.
पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वे वेळापत्रकावरही परिणाम झाला. कर्नाटकच्या गोकाक-पाच्छापूर या भागातील १०७ व १०९ क्रमाकांच्या रेल्वे पुलावर पाणी आल्याने वास्को ते हुबळी पर्यंतच्या थांबविण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी निझामुद्दीनहून वास्कोला येण्यासाठी सुटलेली गाडी अंकई, दौंड, करमाड, सोलापूर, होटगी, विजापूर, गदग, हुबळी, लोंढा या मार्गे वळविण्यात आली तर वास्कोहून निजामुद्दीनला जाण्यासाठी गुरुवारी निघालेली गाडी मडगाव, रोहा, पनवेल, इगतपुरी, मनमाड या मार्गे वळविण्यात आली. तर वास्को-बंगळुरु एक्सप्रेस गाडीसाठी गोव्याहून जाणा:या रेल्वेला डब्यांची कमतरता जाणवल्याने हुबळीपर्यंत ती रद्द करण्यात आली.