रत्नागिरी : गेल्या आठवड्यात धुमाकूळ घालून गेले दोन दिवस विश्रांती घेणारा पाऊस नव्या दमाने मुसळधार पडू लागला आहे. गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेला हा पाऊस अखंड सुरू आहे.गेल्या आठवड्यात शुक्रवारपासून पावसाची संततधार सुरू झाली. शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला. राजापुरात पाणी भरले आणि जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली. सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी संततधार कायम होती. बुधवार आणि गुरुवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. मात्र या दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा त्याने मुसळधार आगमन केले आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवारची सकाळही पूर्ण पावसाळीच झाली आहे. जिल्ह्यात सगळीकडेच पावसाने पुनरागमन केले आहे.
दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीत पुन्हा जोर‘धार’
By मनोज मुळ्ये | Published: July 12, 2024 12:17 PM