चिपळूण : शहर परिसरासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह आज, शनिवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पश्चिम बंगाल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर वादळ वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. चिपळूण परिसरात सायंकाळी सहा वाजता जोरदार पाऊस झाला. आकाशात विजा चमकून वारा देखील वाहत होता आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांची गैरसोय झाली. विशेषतः बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. काही विक्रेत्यांनी बाजारपेठेतील मुख्य रस्त्या लगत मांडलेला माल हटवताना तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला, तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. मात्र कुठेही नुकसान झालेले नाही.
चिपळूणमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
By संदीप बांद्रे | Published: November 25, 2023 6:51 PM