ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊसचिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात घरांचे किरकोळ नुकसान
रत्नागिरी - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस पडत आहे.सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण चांगले आहे. रविवार २० सप्टेंबरच्या सायंकाळपासून पावसाने आपली संततधार कायम ठेवली आहे.
या पावसात सातत्य असले तरी त्यात जोर नसल्याने सुदैवाने कोठेही पूरस्थिती नाही. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात झालेले घरांचे किरकोळ नुकसान वगळता कोठेही पावसामुळे समस्या नाही.