रत्नागिरी, दि. ३ : सोमवारी सायंकाळपासून ढगांच्या गडगडाटात सुरू झालेल्या पावसाने रात्रभर कहर केला. प्रचंड गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस सुरूच होता. सोमवारी रात्री रत्नागिरी शहरातील झाडगाव परिसरात वीज पडल्यामुळे नित्यानंद दळवी यांच्या घरातील विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळपासून मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.
गेले अनेक दिवस पावसाने सातत्य ठेवले आहे. रोज सायंकाळच्या वेळेत पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारीही सायंकाळी गडगडाटासह पावसाने आगमन केले. केवळ रत्नागिरीच नाही तर संगमेश्वर, लांजा, चिपळूणसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सोमवारी रात्रभर प्रचंड गडगडाटात पाऊस पडत होता.
सोमवारी रात्री याच पावसात रत्नागिरीच्या झाडगाव एमआयडीसी भाग वीज पडली. त्यात नित्यानंद दळवी यांच्या घरातील फ्रीज, पंख्यासह काही विद्युत उपकरणे जळाली. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.