आरोग्य शिबिर आज
रत्नागिरी : येथील वैश्य युवा संघटनेतर्फे राधाकृष्ण मंदिर येथे दिनांक २८ रोजी सकाळी १० वाजता आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने शिबिर होणार असून, डॉ. केतन पाटील, डॉ. रामेश्वर म्हेत्रे मार्गदर्शन करणार आहेत.
वन्यजनावरांचा उपद्रव
देवरुख : वन्यजनावरांचा उपद्रव वाढला असून शेतीचे नुकसान करत आहेत. माकड, गवे, रानडुक्कर यांचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. परिश्रमाने लावगड केलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना पहारा द्यावा लागत आहे. वाद्य वाजविणे, फटाके फोडणे, शेतात बुजगावणे उभे करणे आदी उपाय अवलंबिले जात आहेत.
प्रशिक्षण कार्यशाळा
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. हायस्कूलमध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधून पाचवी ते दहावीच्या वर्गांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची नवनीतच्या टॉप स्कोअररबाबत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. अभिजित गुडेकर यांनी मार्गदर्शन केले.
पाष्टे यांची निवड
खेड : तालुक्यातील आवाशी शिवसेनेच्या शाखाप्रमुखपदी राजन पाष्टे यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाप्रमुख विजय जाधव यांनी तसे नियुक्तिपत्र दिले आहे. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम उपस्थित होते.