अडरे : मुंबईतील घाटकाेपर येथील ओमसाई गणेश सोसायटी २बी कामराज नगर येथील रहिवाशांनी एकत्र येऊन पैसे जमा करून तर काहींनी वस्तू जमा करत चिपळुणातील पूरग्रस्तांना स्वतः जाऊन मदतीचा हात दिला आहे.
सोसायटी अध्यक्ष प्रकाश गुरव यांनी सांगितले की, आम्ही प्रसार माध्यमातून ही पूरपरिस्थिती पाहत होतो. अक्षरशः डोळ्यातून अश्रू अनावर झाले हाेते. चिपळूणवर जी परिस्थिती ओढवली ती अजून कुठे उद्भवू नये. त्यामुळे खारीचा वाटा म्हणून आमच्या सोसायटीमधील सर्व सभासदांच्या माध्यमातून अत्यावश्यक वस्तूची मदत करत आहोत. यावेळी राजू पिंपले, मंगेश करावडे, शरद कोथेरे, रमेश घनवट मुंडे, नीलेश मालकर, सुरेंद्रन कांबळे, सुशांत कदम, मनीष करावडे, अभिषेक राणे, प्रदीप जाधव, राऊळ काकडे, गणेश कांबळे उपस्थित होते.