अडरे : चिपळूण तालुक्यातील धामनवणे तर डीबीजे महाविद्यालयालगतच्या डाेंगर भागास गुरुवारी सायंकाळी लागलेला वनवा तरुणांसह ग्रामस्थांच्या अखेर परिश्रमानंतर विझविण्यात आला.
तालुक्यात प्रत्येक गावाने वणवा मुक्तीसाठीचा पुढाकार घेतल्यानंतर, त्यातून खऱ्या अर्थाने प्रचार व प्रसार होऊ लागला आहे. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून वनवा लावण्याचे प्रकार वाढत आहेत. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील धामनवणेसह शहरातील डीबीजे महाविद्यालय परिसरातील डोंगर भागाला वणवा लागल्याची घटना घडली. लगतच्या ग्रामस्थांना हा प्रकार समजण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केले होते. लगतच आंबा, काजूच्या बागा असल्याने, हा वणवा त्या दिशेने गेल्यास मोठे नुकसान होण्याचा प्रश्न निर्माण होताच, धामणवने गावातील काही ग्रामस्थांसह तरुणांनी वणवा विझविला. हा वणवा विझविण्यासाठी निसर्गप्रमी राम रेडीज, धामवणे सरपंच सुनील सावंत, नंदू साडविलकर, सुधीर जाधव, सुमेध जाधव, दिनेश जाधव, सुशील मोहिते, अमाले जाधव उपस्थित होता.