रत्नागिरी : चिपळूण शहरासह परिसरात आलेल्या महापुरामुळे व्यापाऱ्यासह पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यात आली. डीश टीव्हीने पूरग्रस्त व्यावसायिक भागीदारांसह ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. डीश टीव्ही इंडिया सर्कल बिझनेस हेड विवेक पिंपलीकर यांच्याहस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.
महापुरात दुकाने पूर्णत: पाण्याखाली गेली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या सर्व साहित्याचे नुकसान झाले. व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी डीश टीव्ही इंडिया सर्कल बिझनेस हेड विवेक पिंपलीकर हे विक्री व विपणन विभागाच्या सहकाऱ्यांसोबत चिपळूणमध्ये आले असता, त्यांनी त्यांच्या सर्व व्यावसायिक भागीदारांची भेट घेतली. सर्व विक्रेत्यांना तात्काळ मदत म्हणून एलईडी टॉर्च, सॅनिटायझर, डेटॉल्स, बादली आणि मग तसेच औषधांचे वाटप करण्यात आले. यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.