जाकादेवी : रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य स्वरुपात सहाय्य करण्यात आले. चिपळूण येथील खेर्डी समर्थनगर, चिपळूण शहर, मिरजोळी, पेठमाप या ठिकाणी ही मदत देण्यात आली.
यावेळी कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे, जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, जिल्हा सचिव संतोष मोहिते, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राजेश गमरे, कोषाध्यक्ष संतोष पडवणकर, शिक्षक पतपेढी संचालक अनंत कदम, लांजा तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे, चिपळूण तालुकाध्यक्ष मनोज पवार, तालुका सचिव सतीश जाधव, राष्ट्रपाल सावंत, सुनील शिवगण, संजय मोहिते, बी. वाय. कांबळे, रवी जाधव उपस्थित होते.
चिपळूण परिसरात उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व महाराष्ट्रातील इतर ठिकाणांहून व कास्ट्राईब हितचिंतकांनी आर्थिक व वस्तूरूपरित्या मदतीचा हात दिला.
-------------------------------------
चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्त भागात कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे मदत करण्यात आली.