रत्नागिरी : हेल्पिंग हँड्स मिशन इंडिया या सेवाभावी संस्थेने चिपळूण येथील ३८० पूरग्रस्त गरजू कुटुंबांना दुसऱ्यांदा भरघोस मदतीचा हात दिला आहे.
या संस्थेने चिपळूणमधील मुरादपूर येथील मिठागरी मोहल्ला, साठे मोहल्ला, रामोशी आळी, खाटीक गल्ली, कळंबस्ते, खेर्डी मोहल्ला, बहादूरशेख नाका, गोवळकोट रोड, पेठमाप बौद्धवाडी, माळेवाडी, भोईवाडी, हार्डीलिया कॉलनी, आदी अनेक वाड्यांतील गरजू कुटुंबांचे प्रथम सर्वेक्षण करून यादी तयार केली व या पूरग्रस्तांच्या घरी जाऊन त्यांच्या गरजेच्या वस्तू, गॅस शेगडी, विविध धान्य, नवीन भांडीसेट, नवीन बिछाने, कपडे, इत्यादी आधी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
पुरामध्ये आपले सर्वस्व गमावलेल्या १८० ते २०० कुटुंबांना या संस्थेने धाव घेऊन आधार दिला होता. दुसऱ्या मदतीच्या फेरीत ३८० कुटुंबांपर्यंत मदत घेऊन पोहोचल्याची माहिती हेल्पिंग हँड्स मिशन इंडिया या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रेम व्हिमल यांनी दिली. खेडोपाडी पुराखाली असलेली गावे, जिथे मदतच पोहोचली नाही, अशा गावांमध्ये जाऊन संस्थेने सर्वेक्षण करून योग्य तो आराखडा तयार केला. त्यानुसार ही मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आली.
या मदतकार्यासाठी हेल्पिंग हँड्स मिशन इंडिया श्रीकांत यादव, प्रजित कांबळे, सतीश इंगवले, दिनेश साबळे, प्रीतेश साबळे, साक्षी शिर्के, हरिश्चंद्र भिसे, चंद्रशेखर कात्रे काका, विकास कांबळे, निखिल काळोखे, मयंक लांजेकर, फरहान सरगुरो, रमेश शिर्के, गणेश शिर्के, सूरज शिर्के, फईद सरगुरो, आदी अहोरात्र कार्य करीत होते. मिशनच्या या कार्याबद्दल प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांनी या संस्थेचे आभार मानले.