रत्नागिरी : हाय रे हाय, कोरोनाच्या जीवात काय नाय रे... होलियो... अशा फाका घालत कोरोनाच्या सावटातही कोकणातील अत्यंत महत्त्वाच्या शिमग्याला उत्साहात सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात ११६७ सार्वजनिक, तर ३०७९ खासगी होळ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे अनेक निर्बंध असले तरी देवाची पालखी घरी येणार हा भाविकांचा आनंद मात्र कायम आहे.कोकणात सध्या सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू झाली असली तरी कोरोनाचे सावट मात्र आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही होळी पेटविण्यात येते. शेवरीचे झाड वाजत गाजत आणून फाक पंचमीला होळी उभी केली जाते. मुख्य होळीच्या बाजुला छोटी होळी दहा दिवस पेटविण्यात येते. होळी पौर्णिमेला मात्र मोठा होम केला जातो. गणेशोत्सवाइतकाच शिमगा हाही रत्नागिरी जिल्ह्यातील मोठा सण गुरुवारपासून सुरू झाला आहे.शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालख्या रूपे लावून सजविण्यात येतात. या पालख्या होळी पौर्णिमेला ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडतात, काही रंगपंचमीनंतर देवळात परतात, तर काही गावातून चैत्रीपर्यंत पालखी उत्सव साजरा केला जातो. त्याप्रमाणे जिल्ह्यातील १३७७ ग्रामदेवतांच्या पालख्या ग्रामप्रदक्षिणा सुरू करतील.रत्नागिरी शहर व ग्रामीण तसेच जिल्ह्यातील पोलीस स्थानकांच्या हद्दीत पेटविण्यात येणाऱ्या खासगी, सार्वजनिक होळ्यांची संख्या तसेच ग्रामप्रक्षिणेला बाहेर पडणाऱ्या पालख्यांची संख्या पुढीलप्रमाणे :रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत १५ सार्वजनिक, तर १०७ खासगी होळ्या पेटविण्यात येणार आहेत. शिवाय १५ पालख्या ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडणार आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत ७२ सार्वजनिक तर १३० खासगी होळ्या, ६८ पालख्या, गुहागर पोलिस स्थानकाच्या हद्दीत ४६ सार्वजनिक व २३० खासगी, ४६ पालख्या, जयगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ४५ सार्वजनिक व १६६ खासगी, २० पालख्या, पूर्णगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ३० सार्वजनिक, ६५ खासगी, ५५ पालख्या, राजापुरात १०४ सार्वजनिक, १४२ खासगी, ६१ पालख्या, नाटे येथे १२ सार्वजनिक व ४२ खासगी, २३ पालख्या, लांजामध्ये ९६ सार्वजनिक व ११४ खासगी, ९८ पालख्या, देवरूखात १२० खासगी, ११२ पालख्या, संगमेश्वरला ७९ सार्वजनिक, १६८ खासगी, ७९ पालख्या, चिपळुणात ९५, सार्वजनिक व १७० खासगी, ७२ पालख्या, सावर्डे येथे ४३ सार्वजनिक व २५० खासगी, ४० पालख्या, अलोरेत ३१ सार्वजनिक, ३४५ खासगी, ३१ पालख्या, खेडमध्ये २२० सार्वजनिक व ३६० खासगी, ५७१ पालख्या, दापोलीत १५० सार्वजनिक व ३७५ खासगी, दाभोळमध्ये २४ सार्वजनिक व ५७ खासगी, १८ पालख्या, मंडणगड येथे ७५ सार्वजनिक व १६५ खासगी, ५५ पालख्या, बाणकोट येथे ३० सार्वजनिक व ७३ खासगी होळ्या उभारल्या जाणार असून, १८ पालख्या ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडतील.
हाय रे हाय आणि कोरोनाच्या जीवात काय नाय रे, होलियो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 3:46 PM
Holi Ratnagiri : हाय रे हाय, कोरोनाच्या जीवात काय नाय रे... होलियो... अशा फाका घालत कोरोनाच्या सावटातही कोकणातील अत्यंत महत्त्वाच्या शिमग्याला उत्साहात सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात ११६७ सार्वजनिक, तर ३०७९ खासगी होळ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे अनेक निर्बंध असले तरी देवाची पालखी घरी येणार हा भाविकांचा आनंद मात्र कायम आहे.
ठळक मुद्देहाय रे हाय आणि कोरोनाच्या जीवात काय नाय रे, होलियो!जिल्ह्यातील १३७७ ग्रामदेवतांच्या पालख्या ग्रामप्रदक्षिणा सुरू करतील