खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून दुसऱ्या लाटेत तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांनी उच्चांकच गाठला. या महिन्यातच सर्वाधिक १,१३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर २५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २,७२८ वर पोहोचली असून, २,१७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ४५० रुग्ण सक्रिय असून, आतापर्यंत १०६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार, ५१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गतवर्षी मार्चपासून कोरोनाचा फैलाव सुरू झाला. मात्र, तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी एप्रिल महिन्यात गेला. या महिन्यात एकच कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर मात्र, कोरोनाचा कहर सुरू होऊन मे महिन्यात ३४ जणांना कोरोनाची लागण झाली. जूनमध्ये ५६ रुग्ण कोरोनाबाधित झाले, तर दोघांचा मृत्यू झाला. जुलैमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढून २८० वर पोहोचली, तर ६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. ऑगस्टमध्ये ३६८ कोरोनाबाधित तर २० जण कोरोनाने दगावले. गतवर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाने कहर करत कोरोनाबाधितांची संख्या ५४७ वर पोहोचली होती. याच महिन्यात सर्वाधिक ३२ जणांचा कोरोनाने बळी गेला होता. त्यानंतर, कोरोनाबाधितांची संख्या व मृतांच्या संख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता. या वर्षी एप्रिल महिन्यात मात्र कोरोनाने थैमानच घातले. सुरुवातीपासूनच कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. या महिन्यात तब्बल १,१३९ इतके आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
६०९ कन्टेन्मेंट झोन कार्यान्वित
२६ कन्टेन्मेंट झोन कार्यरत
आढलेले रुग्ण
लोटे प्राथमिक आरोग्य केंद्र ५२९
खेड नगरपरिषद हद्दीत ५०४
आंबवली ४९५
फुरुस २९७
शिव बुद्रुक २५०
तिसंगी २२९
तळे १७१
वावे १३१
कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ८३