खेड : चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. खेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे आंबा आणि काजूचे पीक नष्ट झाले आहे. पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादनाला गळती लागल्याने यंदाचे आंबा व काजूपासून मिळणाऱ््या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. अशातच सुके गवत पाण्यात गेल्याने शेतकरी मात्र दुबार संकटात सापडला आहे़ शनिवारी सुरू झालेला पाऊस रविवारीदेखील कायम राहिला. रविवारी दुपारपासून पावसाने जोर धरल्याने अनेकांना आपले व्यवहार बंद ठेवावे लागले़ ऐन शिमगोत्सवामध्ये पावसाने संततधार लावल्याने शेतकऱ्यांचे तीनतेरा वाजले आहेत. होळीसाठी साठवून ठेवलेले सुके गवत आणि भारे या पावसामध्ये भिजल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.दोन दिवस कोसळलेल्या पावसाने केवळ सर्वसामान्यांचेच नव्हे, तर सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवून लावले आहे. खेड तालुक्यातील भरणे, सुकिवली, सुसेरी, कोरेगाव, संगलट, पंधरागाव, धामणंद तसेच बहुतांश गावामधील शेतकऱ्यांची आंबा पिके या पावसाने नष्ट केली आहेत.करटेल गावासह सुकिवली, भरणे, खवटी आणि कशेडी अनेक काही शेतकऱ्यांनी जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा पावसामध्ये भिजला. हा चारा आता जनावरे खात नाहीत. यामुळे हा चारा सडणार आहे़ सुक्या चाऱ्याखेरीज या शेतकऱ्यांकडे अन्य कोणत्याही प्रकारचा चारा नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. तालुक्यातील खाडीपट्टा आणि पंधरागाव धामणंद आणि भरणे, सुकिवली, खेड परिसरातील अनेक आंबा व काजूच्या बागांवर संकट ओढवले आहे. नुकताच आलेला अांबा पावसामध्ये भिजल्याने उत्पादनाला गळती लागली आहे.किरकोळ स्वरूपात असलेल्या आंबा बागायतदारदेख्ीाल आता चिंतेत सापडले आहेत़ ठिकठिकाणी आंब्याला गळती लागल्याने कोवळ्या आंब्याचे ढीग पाहावयास मिळत आहेत. काही झाडांना आलेला मोेहोरही गळून पडला आहे. काजूची अवस्था याहून वेगळी राहिलेली नाही. त्यामुळे अनेक बागायतदारांनी डोक्याला हात लावला आहे.या अस्मानी संकटानंतर हातातोंडाशी आलेली पिके पावसाने नासवल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आता सरकारनेच याबाबत पुढाकार घेऊन कोकणातील आणि विशेषत: खेड तालुक्यातील या पिकांना संरक्षण देण्याची मागणी बागायतदारांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अवकाळी पावसामुळे लाखो रूपयांचे काजूचे पीक हाताबाहेर गेले आहे. आता हे नुकसान कसे भरून काढणार? या पिकावर वर्षाचे अर्थार्जन होत होते. मात्र, आता पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यापलिकडे गेले आहे.- मधुकर चाळके,काजू बागायतदार, सुकिवलीगेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार संकटात सापडला आहे. निसर्गाचे मोठे संकट आल्याने याचा सामना कसा करावा? असा पेच आमच्यासमोर निर्माण झाला आहे.- समीर जाधव,आंबा बागायतदार, कोरेगाव.अवकाळी पावसाने केला घात, जनावरांच्या तोेंडचा घासही घेतला काढून.राज्य शासनाने मदत करण्याची मागणी.भरणे, सुकिवली, सुसेरी, कोरेगाव, संगलट, पंधरागाव, धामणंद परिसरातील आंबा पिके पावाने केली नष्ट.
बागायतीला अवकळा
By admin | Published: March 04, 2015 9:43 PM