शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

एचआयव्हीग्रस्तांना एस. टी. प्रवासात सवलत मिळावी

By admin | Published: December 04, 2014 10:43 PM

गुरुप्रसाद संस्था : रत्नागिरीच्या विभाग नियंत्रकांना दिले निवेदन

रत्नागिरी : एचआयव्हीग्रस्त रूग्णांना येथील एड्स प्रतिबंधक उपचार केंद्रात (ए. आर. टी.) तपासणी व औषधे नेण्यासाठी यावे लागते. अनेक वेळा या रूग्णांकडे प्रवास करण्यासाठीही पैसे नसतात. त्यामुळे अशा व्यक्तिंना प्रवास सवलत मिळावी, यासाठी येथील गुरूप्रसाद ट्रस्टतर्फे एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.एड्सग्रस्तांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन हिणकस आहे. मात्र, तो बदलण्यासाठी प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करतानाच अशा रूग्णांना जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देण्याचा, त्यांच्यात आशावाद निर्माण करण्याचा प्रयत्न येथील गुरूप्रसाद ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था गेली अकरा वर्षे करीत आहे. रूग्णांना जगण्यासाठी आधार देण्याबराबरोबरच गुरूप्रसाद ट्रस्टचे जनजागृतीचे कार्यही निरंतन चालूच आहे. मात्र, जिल्ह्यातील या रूग्णांना येथील ए. आर. टी. केंद्रात येऊन औषधे घेऊन जावे लागते. तसेच तपासणीही करून घ्यावी लागते. बरेचदा येण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नसतात. त्यामुळे त्यांच्या उपचारात खंड पडू शकतो. त्यांना प्रवासात सवलत मिळावी, यासाठी येथील गुरूप्रसाद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी देशमुख यांची भेट घेतली. यावेळी देशमुख यांनी सकारात्मकता दर्शवत यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.शासकीय स्तरावर मोफत बससेवेसाठी पाठपुरावा करावा, यासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्याकडेही निवेदनाची प्रत देण्यात आली. बाधित व्यक्तिंसाठी गुरूप्रसाद ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शन केंद्र चालवले जाते. या केंद्रात दररोज औषधोपचारांबरोबर जीवनशैलीतील बदल, योगासने तसेच संतुलित आहार आदींबाबत मार्गदर्शन केले जाते. गरजू रूग्णांना औषधे, प्रवासखर्च यांसारखी आर्थिक मदत ही संस्था करते. यातील अनेक सेवा केवळ जनतेकडून मिळणाऱ्या देणगीवरच दिल्या जातात. या अव्याहत कार्यासाठी संस्थेला समाजाच्या आर्थिक पाठबळाची गरज असल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)