दापोली : शालेय शिक्षण विभागातील उपसचिवांच्या पत्रानुसार दिवाळी सुट्टी दिनांक १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर अशी देण्यात आली आहे, याचा आम्ही निषेध करतो, असे शिक्षक भारती उर्दूचे राज्य प्रमुख कार्यवाह मुबीन बामणे यांनी सांगितले.दिनांक २३ मार्चपासून पूर्ण देशात लॉकडाऊन सुरू झाले. तेव्हापासून जवळजवळ ८ महिने शिक्षक जीव धोक्यात घालून कोरोनाची ड्युटी करत आहेत. त्यांना आपल्या गावी कुटुंबाकडे जाता आलेले नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र्राचा मोठा सण म्हणून साजरा होणाऱ्या दिवाळी सणाला केवळ ५ दिवसांची सुट्टी जाहीर करून शासनाने शिक्षकांची चेष्टा करण्याचे काम केले आहे. शिक्षक भारतीने याचा तीव्र निषेध केला असून, राज्यभर या परिपत्रकाची होळी करीत निषेध केला जाणार असल्याची माहिती शिक्षक भारती उर्दूचे राज्य प्रमुख कार्यवाह बामणे यांनी सांगितले.शिक्षकांनी उन्हाळी सुट्टी क्वांरटाईन कक्षावर ड्युटी करण्यात घालवली. काही शिक्षक तपासणी नाक्यांवर पोलिसांसोबत होते. जीवाला धोका असूनही त्यांनी शासनाने दिलेले काम प्रामाणिकपणे केले. दिवसभराची ड्युटी असो वा रात्रीची ती करताना मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण व गृहभेट ही कामेसुद्धा सुरुच ठेवली. या सर्व गोष्टींचा विचार करता, शासनाने हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे. दिवाळीची सुट्टी किमान १२ दिवस द्यावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.
शिक्षक भारतीकडून परिपत्रकाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 3:31 PM
educationsector, diwali, ratnagiri, teacher शालेय शिक्षण विभागातील उपसचिवांच्या पत्रानुसार दिवाळी सुट्टी दिनांक १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर अशी देण्यात आली आहे, याचा आम्ही निषेध करतो, असे शिक्षक भारती उर्दूचे राज्य प्रमुख कार्यवाह मुबीन बामणे यांनी सांगितले.
ठळक मुद्देशिक्षक भारतीकडून परिपत्रकाची होळीदिवाळी सणाला केवळ ५ दिवसांची सुट्टी