लांजा : शेतकरीविरोधी कृषी विधेयक हे सामान्य शेतकऱ्यांना मारक ठरणारे असल्याने हे कृषी विधेयक रद्द करण्यासाठी लांजा तालुक्यात घरोघरी जावून जनजागृती करण्याचा निर्धार लांजा तालुका कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे.या बैठकीत निवडणूक काळात उमेदवारी पदरात पाडून घेणारे पुन्हा तालुक्यात फिरकत नसल्याने अशांची पक्षातील वरिष्ठांनी दखल घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नेटाने काम करण्याचा निर्धार करण्यात आला. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कृषी धोरणाला विरोध करण्यासाठी, जनआंदोलन उभे राहण्यासाठी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँगेसचे पक्ष निरीक्षक मनोज शिंदे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.लांजा तालुका पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष विजय भोसले, लांजा तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, सचिव महेश सप्रे, शहराध्यक्ष प्रसन्न शेट्ये, राजेश राणे, मोहन दाभोलकर, नगरसेवक गुल्या नेवरेकर, प्रकाश लांजेकर, सेवा दलाचे अध्यक्ष भगते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संजय आयरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मोदी सरकारने शेतकरीविरोधी जो कायदा केला आहे, त्याबाबत जिल्हाध्यक्ष विजय भोसले आणि जिल्हा पक्ष निरीक्षक मनोज शिंदे यांनी मार्गदर्शन केले. लांजा तालुक्यात घरोघरी जावून या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले. देशातील सर्व शेतकऱ्यांच्या सहीचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार आहे.
कृषी विधेयकाविरुद्ध घरोघरी जागृती,कॉंग्रेसचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:43 PM
Farmar, Congres, AgricultureSector, Ratnagirinews शेतकरीविरोधी कृषी विधेयक हे सामान्य शेतकऱ्यांना मारक ठरणारे असल्याने हे कृषी विधेयक रद्द करण्यासाठी लांजा तालुक्यात घरोघरी जावून जनजागृती करण्याचा निर्धार लांजा तालुका कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ठळक मुद्देकृषी विधेयकाविरुद्ध घरोघरी जागृती,कॉंग्रेसचा निर्धारलांजा तालुका कॉंग्रेसच्या बैठकीत जनआंदोलन करण्यासाठी विचारविनिमय