शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
3
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
4
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
5
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
6
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
7
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
8
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
9
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
10
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
11
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
12
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
13
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
14
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
15
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
16
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
17
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
18
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
19
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
20
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन

चिपळुणात केरळच्या धर्तीवर मिळणार हाउसबोटची सुविधा, पर्यटकांना निसर्गसौंदर्याची अनुभूती घेता येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 1:18 PM

मालदोली महिला बचत गट राबवणार उपक्रम 

चिपळूण : कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी, तसेच बचत गटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी दाभोळ खाडीत हाउसबोटचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. मालदोली प्रभाग संघाच्या महिला हा प्रकल्प राबवणार आहेत. या खाडीत सफर करताना केरळपेक्षाही अप्रतिम निसर्गसौंदर्याची अनुभूती पर्यटकांना घेता येणार आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी हाउसबोट प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये चिपळूण येथील वाशिष्ठी दाभोळ खाडीचाही समावेश आहे. या खाडीतील जैवविविधता, मगर सफारी, पांडवकालीन लेणी, गरम पाण्याचे कुंड, कांदळवणाची बेटे, नारळी पोफळीच्या बागा या निसर्गरम्य परिसराचा अनुभव या हाउसबोटीतून घेता येईल. एक कोटी खर्चाच्या या हाउसबोटमध्ये दोन वातानुकूलित खोल्या असून, त्यात प्रशस्त बेड, सोफा, बाथरूमची व्यवस्था आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी सहभागी ३६ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.सर्वसाधारण हाउस बोटिंगमध्ये पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. वर्षाकाठी एक ते दीड कोटींची उलाढाल या प्रकल्पातून अपेक्षित आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या अधिकाऱ्यांनी, तसेच सहभागी महिलांनी केरळमधील हाउस बोट प्रकल्पाची पाहणी केली आहे.

चार समित्यांच्या स्थापना मालदोली येथील अग्निपंख महिला प्रभाग संघ हा प्रकल्प राबवणार आहे. या प्रभाग संघात ३५५ स्वयंसाहाय्यता समूह १८ ग्रामसंघ, तर ३,८४७ महिला सहभागी आहेत. सिंधुरत्न योजनेतून हा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी या महिलांच्या व्यवस्थापन, देखरेख, विपणन, लेखा अशा चार समित्यांच्या स्थापना केल्या आहेत.

वाशिष्ठी दाभोळखाडीत नयनरम्य असा निसर्ग परिसर आहे. पर्यटकांनी हाउस बोटमधून निसर्गाची पाहणी केल्यास पुन्हा ते सातत्याने इकडे आकर्षित होतील, अशी निसर्गाची उधळण येथे पाहायला मिळते. हा प्रकल्प यशस्वीपणे आम्ही राबवू, असा आम्हाला विश्वास आहे. - दीपिका कुळे, अध्यक्ष, अग्निपंख महिला प्रभाग संघ, मालदोली

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणtourismपर्यटन