शहरं
Join us  
Trending Stories
1
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
2
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
3
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
4
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
5
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
6
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
7
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
8
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
9
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
11
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
13
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
14
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
15
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
16
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
17
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
18
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
19
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
20
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

चेतन बनलाय विद्यार्थ्यांसाठी आदर्श

By admin | Published: June 10, 2016 11:38 PM

कथा त्याच्या जिद्दीची : अठराविश्व दारिद्र्याशी दोन हात

रत्नागिरी : ‘वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ या म्हणीप्रमाणे चेतनने घरातील अठराविश्व दारिद्र्याशी दोन हात करत दहावीप्रमाणेच बारावी परीक्षेतही उज्ज्वल यश संपादन केले. वयाच्या १०व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यातच अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पुजलेले. अशा अत्यंत दुर्दम्य व हलाखीच्या परिस्थितीत चेतनने बारावीची परीक्षा ७० टक्क्यांनी उत्तीर्ण होत शाळेत चौथा क्रमांक पटकावला. चेतनचे आई-वडील दोघेही मोलमजुरी करून घर चालवायचे. चेतन लहान असतानाच वडील गेले. वडिलांचे छत्र हरपले असतानाही त्याचा आधार बनली ती त्याची आई चंद्रकला घाटे आणि चेतनची आजी द्रौपदी पाष्टे! चेतनच्या वडिलांचा आधार गेल्यानंतर त्याची आई काही प्रमाणात खचली. पण खचून चालणार नव्हते. आपल्या मागे आपली दोन मुलं आहेत आणि त्याचं शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वत:च्या पायावर उभं झालेलं तिला पहायचं होतं आणि म्हणूनच ही खचून गेलेली आई पुन्हा एकदा आपल्या मुलांसाठी एकट्याने संकटांचा सामना करण्यासाठी उभी राहिली. चेतनचे वडील गेल्यानंतर चेतनच्या आईने मोलमजुरी करत दोन्ही मुलांचे शिक्षण सुरुच ठेवले. मोलमजुरीचे काम करतानाच तिला पुढे जयगडमधील एका हॉटेलमध्ये काम मिळाले. यासाठी तिला सकाळी लवकर हॉटेलमध्ये जावे लागत असे. त्यामुळे घरातील कामे नेहमी हे दोन्ही भाऊ आपापसात वाटून घेत असत. अशा परिस्थितीतही चेतन आपले शिक्षण पूर्ण करत होता. चेतनचे सांडेलावगण हे गाव. तिथूनच ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या माध्यमिक विद्यामंदिर, जयगड या शाळेत त्याचे शिक्षण सुरु होते. आईचे पैसे वाचावे या जाणीवेतून चेतन रोज शाळेचे हे अंतर पायी पार करायचा आणि आईच्या कष्टांना उभारी द्यायचा.चेतनने हीच जिद्द पुढेही टिकवून ठेवली आणि दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळवत पुढे बारावीला वाणिज्य शाखेचा अभ्यासही त्याने दिवसरात्र केला. चेतनचा बराचसा वेळ हा त्याच्या शाळेला पायी येण्या-जाण्यातच जात होता. त्याबरोबरच त्याला घरच्याही कामात लक्ष द्यावे लागायचे आणि म्हणूनच तो सकाळी लवकर उठून आणि रात्री काहीवेळ जागून आपला अभ्यास करत होता. चेतन सांगतो की, मला स्वत:ला शिकून पुढे माझ्या भावालाही शिकवायचे आहे. आई आमच्यासाठी खूप कष्ट घेते. तिच्या कष्टातून निघणाऱ्या प्रत्येक थेंबाचे चीज मी करून दाखवेन. मला पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून अधिकारी व्हायचंय आणि त्याचबरोबर मला माझ्या लहान भावालाही इंजिनिअर बनवायचंय. माझं हे स्वप्न आहे आणि त्यासाठी मी आईसोबत कष्ट घेण्याची तयारी ठेवली आहे. सध्या जिंंदाल कंपनीच्या आयटीआयमध्ये तो शिकत असून, पुढील शिक्षणही काम करतच घेणार असल्याचे चेतन सांगतो. चेतनची जी काही स्वप्नं असतील ती पूर्ण करण्यास मी लागतील तेवढे कष्ट घेण्यास तयार आहे, अशी भावना त्याच्या आईने बोलून दाखवली. (प्रतिनिधी)