खेड/आवाशी : जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी मला साडेसात वर्ष लागली. जर गुवाहाटीला गेलो नसतो तर कदाचित आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आणि उद्योगमंत्री झालो नसतो अशा मिश्किल भाषेत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी टोलेबाजी केली. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योग भवनात रविवारी (६ नाेव्हेंबर) रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी त्यांनी काही उद्योजकांनाही चिमटे काढले.मंत्री उदय सामंत यांचा लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये नियोजित दौरा होता. यावेळी लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे नूतन उद्योगमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सामंत यांनी लोटे एमआयडीसीमधील उद्योग आणि रोजगार वाढण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून कोणते प्रयत्न केले जाणार याबाबत मार्गदर्शन केले.ते पुढे म्हणाले की, आज मला याच जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी साडेसात वर्ष लागली. गुवाहाटीला गेलो नसतो तर आज मी या जिल्ह्याचा पालकमंत्री नसतो आणि उद्योगमंत्रीही नसतो. आज उद्योगमंत्री म्हणून मी या ठिकाणी आल्यानंतर आजची वागणूक खूप चांगली आहे. मात्र याआधी आपल्याला अशी वागणूक या एमआयडीसीमधून मिळाली नव्हती, असे मंत्री सामंत यांनी सुनावले.लोटे औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत मुंबईत सचिवांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक लवकरच घेतली जाईल आणि येत्या तीन महिन्यांत महत्त्वाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजनांबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
खोका उघडून बघाया कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांना गणपतीची मूर्ती भेट देण्यात आली. मात्र, ती खोक्यात असल्याने मंत्री सामंत यांनी हा खोका उघडून बघा नाहीतर उगाचच गैरसमज निर्माण होतील, असा मिश्किल टोला विरोधकांना लगावला