शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल करण्याचे ध्येय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By मनोज मुळ्ये | Published: November 30, 2023 6:45 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण तसेच नमो ११ सुत्री कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरीत झाला

रत्नागिरी : सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे, त्याच्यासाठी चांगले दिवस आले पाहिजेत, हे ध्येय बाळगून महायुतीचे सरकार कार्यरत असल्याने हे सरकार गतिमान आहे. सामान्यांच्या मनातील सरकार आणि सामान्य मुख्यमंत्री असला की कामे गतीने होतात, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण तसेच नमो ११ सुत्री कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते रत्नागिरीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य खात्याचे सचिव राजीव निवतकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, माजी आमदार विनय नातू, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.प्रथम मुख्यमंत्री शिंदे यांनी फीत कापून महाविद्यालयाचे लोकार्पण केले. त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी नमो ११ सुत्री कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यातील प्रातिनिधिक लाभार्थींना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे विशेष कौतुक केले. जगासमोर भारताची प्रतिमा उजवी करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा हातभार आहे. त्यामुळेच त्यांच्या ७३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने नमो ११ सुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून सर्वसामान्य विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे