..अन्यथा एकटे लढू, काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा निर्धार
By संदीप बांद्रे | Published: June 10, 2023 05:02 PM2023-06-10T17:02:59+5:302023-06-10T17:10:34+5:30
चिपळूण : आगामी निवडणुकीबाबत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय प्रदेशचा आहे. आगामी निवडणुका लढण्यास आम्ही सज्ज आहोत. आघाडी झाली तर ...
चिपळूण : आगामी निवडणुकीबाबत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय प्रदेशचा आहे. आगामी निवडणुका लढण्यास आम्ही सज्ज आहोत. आघाडी झाली तर ठीक अन्यथा आम्ही एकटे लढण्याची ताकद आहे, असे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी चिपळूण येथे पत्रकारांशी बाेलताना सांगितले.
शहरातील ब्राह्मण सहायक संघाच्या सभागृहात जिल्हा कॉंग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, इब्राहीम दलवाई, भरत लब्धे, अशोक जाधव, नंदू थरवळ, अल्पेश मोरे, वासू मेस्त्री यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर अविनाश लाड यांच्यासह माजी खासदार हुसेन दलवाई, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हुसेन दलवाई म्हणाले की, जिल्ह्यात कॉंग्रेस विकलांग आहे, हे आम्हाला मान्य आहे. कॉंग्रेस मजबूत करण्यासाठीच आम्ही बैठकीचे आयोजन केले होते. यापुढच्या काळात प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय बूथकमिट्या स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तालुकाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष सातत्याने जनतेच्या प्रश्नासाठी लढा देत आहे. येथील शहर व तालुक्यात कॉंग्रेसची चांगली ताकद आहे. त्यामुळे कॉंग्रेस निवडणुकीसाठी जोमाने तयारी करीत आहे. जनतेच्या संपर्कासाठी कार्यालय सुरू होत असल्याचेही स्पष्ट केले.