रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धसका पर्यटकांनी घेतला असल्याने आंतरराष्ट्रीयच नव्हे तर राष्ट्रीय पर्यटनावर परिणाम झाला आहे. एप्रिल व मे महिन्यात सुट्ट्या असल्याने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पर्यटक पर्यटनासाठी आवडीनुसार आगाऊ आरक्षण करीत असतात. मात्र, केलेले आरक्षण रद्द करीत आहेत, शिवाय नवीन आरक्षण तर पूर्णत: बंद केले आहे.एप्रिल व मे मध्ये शाळा, महाविद्यालयांना दीर्घ सुट्टी असते. यावेळी पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या मंडळींची संख्या अधिक आहे. ग्रुप बुकिंग अथवा सिंगल बुकिंग करण्याची सुविधा रत्नागिरीमध्येही उपलब्ध आहे. रत्नागिरीबरोबर पुणे, मुंबईतूनही मित्रमंडळींसमवेत पर्यटनाला बाहेर पडणारी मंडळी अधिक आहे. परंतु कोरोनाचा धसका, शिवाय विषाणू संसर्ग झालेल्यांची वाढती संख्या याबाबतची वृत्ते सातत्याने कानावर येत असल्याने खबरदारी म्हणून अनेक रत्नागिरीकरांनी परदेशी जाणे टाळले आहे.
इतकेच नव्हे तर देशांतर्गतच्या सहलींवरही त्याचा परिणाम झाला आहे. दिल्ली, केरळ तसेच थंड हवेच्या ठिकाणच्या सहली रद्द करण्यात येत आहेत. नवीन आरक्षण तर बंदच आहे, शिवाय पूर्वी केलेले आरक्षणही रद्द करण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे पर्यटनावर त्याचा परिणाम अधिक झाला आहे.
सहली आयोजित करणाºया कंपन्या पर्यटकांसाठी गुजरात, सौराष्ट्र सारख्याठिकाणचे पर्याय सहलींसाठी सुचवित आहेत. दरवर्षी एप्रिल, मे मध्ये तीस ते चाळीस हजार मंडळी रत्नागिरीतून पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय सहलींसाठी बाहेर पडतात. मात्र, यावर्षी खबरदारी म्हणून सहलींना पूर्णत: विराम दिला आहे, तर काहींनी मात्र ह्यवेट आणि वॉचह्णची भूमिका घेतली आहे.व्हिसादेखील बंदयुरोप, सिंगापूर, थायलंड, इटली यांसारख्या देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने या देशातील पर्यटनच नव्हे तर नोकरीच्या व्हिसाही बंद करण्यात आल्या आहेत. आखातील प्रदेशात इराणमधील व्हिसा बंद करण्यात आला आहे. मात्र, अन्य देशातही सुट्टीसाठी आलेल्या भारतीयांचीदेखील वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे.चर्चासत्रांचे आयोजनकोरोना विषाणू संसर्गाबाबतचा धसका घेतल्यानेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पर्यटनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सहलींचे आयोजन करणाऱ्या व्यावसायिकांनाही याचा आर्थिक फटका बसला आहे. व्यावसायिक कंपन्यांकडून याबाबतचा पर्याय अथवा योग्य निर्णयासाठी चर्चासत्र, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या मनात करोनाची भीती वाढत आहे. परिणामी यावर्षी सहलींना जाणे पर्यटक टाळू लागले आहेत. आधी केलेले आरक्षण रद्द करण्यात येत आहे. परदेशी सहलींबरोबर भारतातील थंड हवेची ठिकाणेही टाळत आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायापुढे सध्या तरी प्रश्न निर्माण झाला आहे- नीलेश मुळ्ये,व्यावसायिक, रत्नागिरी
परदेशाबरोबर देशांतर्गतच्या पर्यटन सहलींसाठी पर्यटक नकार दर्शवित आहेत. थंड हवेच्या ठिकाणाऐवजी पर्यटकांना अन्य पर्याय सुचवित आहोत. परंतु पर्यटक सध्या तरी सहलच नको म्हणून केलेले आरक्षण रद्द करीत आहेत. पर्यटक कोणतीही रिस्क घेण्यास तयार नसल्याने ह्यवॉच अॅण्ड वेटह्णची भूमिका घेतली आहे.- वरूण लिमये,व्यावसायिक, रत्नागिरी
रत्नागिरीत पर्यटनासाठी येण्याकरिता पर्यटक आगाऊ आरक्षण करीत आहेत. रत्नागिरीचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सियसच्या घरात असल्याने कोरोना विषाणू या वातावरण तग धरू शकत नसल्याचे वैद्यकीय क्षेत्राकडून सांगण्यात येत असल्याने सध्या तरी केलेले आरक्षण थांबविण्यात आलेले नाही. रत्नागिरीत येणाºया पर्यटकांचे बुकिंग सुरू असले तरी त्याला फारशी गती नाही.- सुहास ठाकूरदेसाई,व्यावसायिक, रत्नागिरी
युरोपबरोबर सिंगापूर, थायलंड, इटली येथील सहली थांबविण्यात आल्या आहेत. या देशातील विमानसेवेतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे परदेशी पर्यटन तूर्तास तरी पूर्णत: थांबलेले आहे. केलेले आरक्षण रद्द करीत सुरक्षा म्हणून आहे त्याच ठिकाणी मंडळींनी थांबणे पसंत केले असल्यानेच पर्यटन व्यवसायाला त्याचा फटका चांगलाच बसला आहे.- संजय वझे, व्यावसायिक, मुंबई